Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Constable Recruitment 2022 : CISF मध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती; कुठे, कसा करायचा...

Constable Recruitment 2022 : CISF मध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती; कुठे, कसा करायचा अर्ज… जाणून घ्या

Subscribe

तरुणांसाठी देशाच्या संरक्षणासाठी काम करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती सुरु होणार आहे. २४९ रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती क्रिडा कोट्यातून केली जाणार आहे. (CISF Constable Recruitment 2022) या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार सीआयएसएफच्या अधिकृत cisf.gov.in वर जाऊन नोटीफिकेशन डाऊनलोड करु शकतात. तसेच पूर्ण माहिती जाणून घेत अर्ज करु शकतात. यात १८१ पुरुष तसेच ६८ महिला उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया वेबसाईटवर सुरु झाली आहे. यात उमेदवार ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. (CISF Constable Recruitment)

पात्रता

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने हेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराला बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच स्पोर्ट्स सर्टिफिकेटची देखील आवश्यकता आहे. नियुक्त झालेले उमेदवार भारताबाहेरही सेवा देण्यासाठी पात्र असतील. याची विस्तृत माहिती नोटीफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

पगार

- Advertisement -

हेड कॉन्स्टेबल जीडी पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना महिन्याला २५,५०० ते ८१,१०० रुपयांचा पगार निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय केंद्राचा अतिरिक्त भत्ता देखील दिला जाईल. (CISF Constable)

वयोमर्यादा

उमेदवाराचा जन्म ०२ ऑगस्ट १९९८ ते ०१ ऑगस्ट २००३ दरम्यानचा असावा. यात आरक्षित कोट्यातील उमेदवाराला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. तसेच उमेदवाराला भरतीसाठी शारीरिक चाचणी परीक्षेदेखील पार करावी लागणार आहे.


Vaishno Devi : वैष्णोदेवी यात्रेसाठी काय आहेत नियम? तरीही चेंगराचेंगरीची घटना का घडली?

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -