Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश श्रीलंकेतील स्थिती आणखी गंभीर, नागरिक आक्रमक होताच राष्ट्रपतींचा पळ

श्रीलंकेतील स्थिती आणखी गंभीर, नागरिक आक्रमक होताच राष्ट्रपतींचा पळ

Subscribe

आर्थिक गर्तेत सापडलेल्या श्रीलंकेत उद्रेक झाला असून नागरीक आक्रमक झाले आहेत. . शनिवारी राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला नागरिकांनी घेराव घातला. यानंतर गोयबाया राजपक्षे यांनी निवासस्थान सोडून पळ काढला.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या श्रीलंकेतील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिथे उद्रेक झाला असून नागरीक आक्रमक झाले आहेत. शनिवारी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला नागरिकांनी घेराव घातला. यानंतर गोटबाया राजपक्षे यांनी निवासस्थान सोडून पळ काढला असून ते सध्या राष्ट्रपती भवनात नसल्याची माहिती संरक्षण विभागातील सुत्रांनी दिली आहे.

श्रीलंकेकडे परकीय चलनाची गंगाजळी शिल्लक नाही. शिवाय, नागरिकांकडून करवसुली करणेही शक्य नाही. त्यामुळे चलनी नोटा छापल्या जात आहेत. पण वस्तू उपलब्ध नाहीत, अशी स्थिती तिथे उद्भवली आहे. याआधी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यावर विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. ते सर्वमान्य नेते असल्याने त्यांनी पाचव्यांदा देशाचा कारभार आपल्या हाती घेतला.

- Advertisement -

राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी –

- Advertisement -

श्रीलंकेत सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रॅली काढल्या जात आहे. सरकार विरोधात देशभरात हिंसक निदर्शनं होतं आहे.यादरम्यान आंदोलकांनी कोलंबो स्थित राष्ट्रपती भवनाला घेरले होते. यावेळी राष्ट्रपती भवनातील सामानाची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली असून वाढत्या आर्थिक संकटामळे गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

श्रीलंकेत अनिश्चित काळासाठी कर्फ्यू –

शुक्रवारी श्रीलंकेत अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. सैन्याला हायअलर्टचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस प्रमुख चंदना विक्रमरत्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये शुक्रवारी नऊ वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हजारो आंदोलकांनी सरकार विरोधी निदर्शने करत राष्ट्रपती भवनातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भवनात प्रवेश केला होता. त्यामुळे कर्फ्यूची घोषणा करण्यात आल्याचे पोलीस अधिकारी म्हणाले.

विक्रमसिंघेंनी बोलावली बैठक –

श्रीलंकेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि त्वरित तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. तसेच ते सभापतींना संसद बोलावण्याची विनंती करणार आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -