घरताज्या घडामोडीउन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त, देशातील या राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट...

उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त, देशातील या राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Subscribe

देशातील काही भागांत पावसाने (Monsoon In Delhi) हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. राजधानी दिल्ली, पंजाब आणि राजस्थानसह उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागात तीव्र उष्णतेच्या झळा बरसत आहेत. वाढत्या तापमानाबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले की, या विविध भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात १४ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर मध्य आणि लगतच्या पूर्व भारतातील बहुतेक भागांतून उष्णतेच्या लाटेची स्थिती कमी झाली आहे. येत्या दोन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात लक्षणीय बदल होणार नाही आणि त्यानंतर हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisement -

देशातील या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये गडगडाटासह वादळाची शक्यता असल्याची माहितीही IMDने दिली आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाचा इशाराही जारी केला आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम द्वीपकल्पीय किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आसाम आणि मेघालयमध्ये १३ ते १६ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड, ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये १४-१६ जून दरम्यान गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

दिल्लीत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी

दिल्लीत आज कडाक्याचं ऊन पडलं आहे. किमान तापमान ३१.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात हलक्या सरींचा किंवा रिमझिम पाऊस पडण्यासह ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा : दिल्लीत मेट्रो कार पार्किंगला भीषण आग, अग्निशमनचे ११ बंब घटनास्थळी दाखल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -