घरताज्या घडामोडीNagaland Civilian Killings: दहशतवादी समजून मुजरांवर गोळीबार; SIT एका महिन्यात पूर्ण करणार...

Nagaland Civilian Killings: दहशतवादी समजून मुजरांवर गोळीबार; SIT एका महिन्यात पूर्ण करणार तपास – अमित शहा

Subscribe

नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार घटनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशात लोकसभेत निवेदन सादर केले. चुकीची ओळख झाल्यामुळे ही घटना घडल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. अमित शहा लोकसभेत म्हणाले की, ‘दहशतवादी समजून मुजरांवर गोळीबार करण्यात आला. पण नंतर चुकीची ओळख असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तात्काळ सैनिकांनी मजुरांना रुग्णालयात भरती केले. निर्दोष नागरिकांच्या मृत्यूवर सैन्याकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे.’

- Advertisement -

दरम्यान नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावरून आज सकाळी संसदेत विरोधकांनी हंगामा केला. यामुळे राज्यसभेचे कामकाज सकाळी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत नागालँड गोळीबारसंदर्भात निवेदन मांडले.

लोकसभेत नक्की काय म्हणाले अमित शहा?

अमित शहा म्हणाले की, ‘ओटिंग, सोम येथे दहशतवाद्यांची हालचाल असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे २१ कमांडर संशयित भागात तैनात होऊन हल्ला केला. यादरम्यान एक वाहन घटनास्थळी आले. त्यावेळेस वाहन थांबवण्याचा इशारा दिला. मात्र वाहन थांबले नाही, चालकाने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सैनिकांनी वाहनावर गोळीबार केला. वाहनातून प्रवास करणाऱ्या ८ जणांपैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर समजले की, चुकीच्या ओळखीसंदर्भातील प्रकरण आहे. जखमीपैकी २ जणांना सैनिकांनी आरोग्य केंद्रात नेले.’

- Advertisement -

‘या घटनेबद्दल समजताच स्थानिक लोकांनी सैनिकांच्या पथकाला घेरले. २ वाहनांना आग लावली आणि हल्ला केला. स्थानिक लोकांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून इतर जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाला आत्मरक्षासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. यामध्ये आणखीन ७ नागरिकांचा मृत्यू झाला आणि इतर लोकं जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेसंदर्भात एसआयटी स्थापन केली जाऊन एक महिन्यात तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत,’ असे अमित शहा म्हणाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -