Homeदेश-विदेशCJI : यावर्षात सर्वोच्च न्यायालयात असतील तीन सरन्यायाधीश, सात न्यायमूर्ती होणार निवृत्त

CJI : यावर्षात सर्वोच्च न्यायालयात असतील तीन सरन्यायाधीश, सात न्यायमूर्ती होणार निवृत्त

Subscribe

10 नोव्हेंबर 2024पासून सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती संजीव खन्ना या वर्षी 13 मे रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश असतील आणि त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्ण होईल.

(CJI) नवी दिल्ली : या नव्या वर्षांत भारताचे सरन्यायाधीश म्हणून तीन न्यायमूर्तींचा कार्यकाळ पाहायला मिळेल. यामध्ये विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे. अलीकडे धनंजय चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून जास्त कार्यकाळ मिळाला होता, हे उल्लेखनीय. याशिवाय, या वर्षी सर्वोच्च न्यायालयातून एकूण सात न्यायमूर्ती निवृत्त होणार आहेत. (The Supreme Court will have three Chief Justices in 2025)

माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड नोव्हेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले. तर, 10 नोव्हेंबर 2024पासून सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले न्यायमूर्ती संजीव खन्ना या वर्षी 13 मे रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश असतील आणि त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्ण होईल. त्यापाठोपाठ न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश होतील. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी अद्याप सरकारी निवासस्थानही घेतलेले नाही. कार्यकाळ खूपच लहान असल्याने घर स्थलांतरित करणे आणि नंतर पुन्हा दुसरीकडे शिफ्ट होणे, हा सर्व प्रक्रिया खूपच वेळखाऊ ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Indian Railways : रेल्वेच्या एसी कोचमध्ये आता स्वच्छ ब्लॅंकेट आणि चादर…प्रवाशांची होणार मोठी सोय

धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश म्हणून सर्वात मोठा कार्यकाळ होता. 22 फेब्रुवारी 1978 रोजी ते सरन्यायाधीश झाले आणि 11 जुलै 1985 रोजी निवृत्त झाले. अशाप्रकारे ते 7 वर्षे 5 महिन्यांहून अधिक काळ सरन्यायाधीश होते. तर, अलीकडेच निवृत्त झालेले धनंजय चंद्रचूड यांनाही सुमारे दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला. असे अनेक सरन्यायाधीश झाले आहेत, ज्यांना काही महिन्यांचाच कालावधी मिळाला.

- Advertisement -

हे न्यायमूर्ती होणार निवृत्त

सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायाधीशही या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यात सर्वप्रथम न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम 5 जानेवारी 2025 रोजी निवृत्त होत आहेत. त्यांचा कार्यकाळ सुमारे तीन वर्षे होता आणि केरळ उच्च न्यायालयातून बढती मिळाल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.

न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची सेवानिवृत्ती या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 जानेवारी रोजी आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा कार्यकाळ सुमारे चार वर्षांचा होता. आधी ते गुवाहाटी उच्च न्यायालयात होते आणि त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते. तर विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती अभय एस. ओक 24 मे 2025 रोजी निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा कार्यकाळ सुमारे तीन वर्षांचा आहे. सुप्रीम कोर्टात रुजू होण्यापूर्वी ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि नंतर कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती बीआर गवई हेही याच वर्षी निवृत्त होणार आहेत. (CJI: The Supreme Court will have three Chief Justices in 2025)

हेही वाचा – Kareena Kapoor : कुमार विश्वासांच्या टीकेवरून यूपीत रंगले राजकारण, सपा आणि भाजपा आमनेसामने

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -