Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अमित शाह मणिपूरमधून परतताच सुरक्षा दल आणि हिंसक आंदोलकांमध्ये चकमक

अमित शाह मणिपूरमधून परतताच सुरक्षा दल आणि हिंसक आंदोलकांमध्ये चकमक

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह मणिपुर दौऱ्यावर असताना त्यांनी शांतता आणि सामान्य स्थिती करण्याचे आवाहन केले. मात्र शाह ईशान्य राज्याला रवाना झाल्याच्या एका दिवसानंतर शुक्रवारी पुन्हा मणिपूरच्या विविध भागांतून सुरक्षा दल आणि हिंसक आंदोलनांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळत आहे. (Clashes between security forces and violent protesters as Amit Shah returns from Manipur)

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अमित शाह मणिपुरमधून परतल्यानंतर शुक्रवारी (2 मे) सकाळी बिष्णुपूर जिल्ह्यातील चांदोलपोकपी, तांगजेंग, पोम्बीखोक आणि कमसान गावात हिंसक आंदोलकांनी सुरक्षा दलांशी चकमक केली. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर स्थानिकांना तांगजेंग गाव सोडावे लागले, तर चुराचंदपूर जिल्ह्यातील बेथेल गावातही घरे जाळण्यात आली. मात्र, या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचुप चिंगखॉंग भागात, बंडखोरांनी एक घर जाळले आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे 5 जिल्ह्यांमधून संचारबंदी उठवण्यात आली आहे, तर इतर ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आली. पण लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी आणि अधिकृत कामासाठी एकत्र येण्याची परवानगी दिली गेली नाही आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील जातीय हिंसाचारात किमान 98 जणांनी आपला जीव गमवला आहे, तर 310 जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारात एकूण 37,450 लोक सध्या 272 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत.

दहशतवाद्यांनी शस्त्रे समर्पण केली
मणिपूरमधील हिंसाचारानंतर शांतता राखण्याच्या प्रयत्नांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या आवाहनानंतर 1 जून रोजी राज्यातील विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी शस्त्रे समर्पण केली. ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्यांनी पोलिसांच्या ताब्यात द्यावीत, अन्यथा पोलीस राज्यात शस्त्रे जप्त करण्यासाठी तपास मोहीम राबवतील, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले होते.

- Advertisement -

मणिपुर हिंसाचार कसा झाला?
मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढण्यात आल्यानंतर पहिल्यांदा हिंसाचाराची घटना घडली. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के मेईटी आहेत, यापैकी बहुतेक इंफाळ खोऱ्यात राहतात. याशिवाय आदिवासी नाग आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे 10,000 जवान तैनात करण्यात आले होते.

- Advertisment -