घरदेश-विदेशपिझ्झाचे आमिष दाखवून विद्यार्थीनीवर बलात्कार

पिझ्झाचे आमिष दाखवून विद्यार्थीनीवर बलात्कार

Subscribe

पुर्व दिल्लीमध्ये सरकारी शाळेत शिकणाऱ्या दहावीतील एका विद्यार्थीनीला पिझ्झाचे आमिष दाखवून चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी कल्याणपुरी परिसरात घडली आहे. या दुष्कृत्यामध्ये पीडित मुलीचा घरमालकाचा मुलगा देखील सहभागी आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, घरमालकाच्या मुलाने पिझ्झा देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थीनीला एका खोलीमध्ये नेले. त्यानंतर तिथे आणखी तीन मित्रांनाही बोलवले. पोलिसांनी सांगितले की, सर्व मुले दारूच्या नशेत होती. मुलीवर अत्याचार केल्यानंतर याची वाच्यता कुठेही करु नये, अशी धमकीही मुलीला देण्यात आली होती.

- Advertisement -

मुलीची आई जेव्हा कामावरुन परत आली तेव्हा पीडित मुलीने आपल्यावर ओढवलेला प्रसंग आईल सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पोक्सो आणि आयपीसीच्या कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करत तात्काळ आरोपींना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, घरमालकाचा मुलगा २८ वर्षांचा आहे आणि त्याचे लग्न झालेले आहे. तसेच त्याच्या मित्रांपैकी एकजण १९ वर्षांचा आहे. तर इतर दोन आरोपी ३० वर्षांचे आहेत.

निर्भयातून दिल्लीला धडा नाही

डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर देशभरात संतपाची लाठ उसळली. पोलिसांनी आरोपींना जेरबंदही केले. कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र त्यानंतरही दिल्लीमध्ये बलात्काराच्या घटना घडतच आहेत. दिल्लीमध्ये मुलींना सुरक्षा पुरविण्यात आणि वासनांध तरुणांना लगाम घालण्यात दिल्ली पोलीस प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -