घर ताज्या घडामोडी कर्नाटकच्या पराभवानंतर मोदींकडून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा क्लास, योगींच्या अनुपस्थितीची चर्चा?

कर्नाटकच्या पराभवानंतर मोदींकडून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा क्लास, योगींच्या अनुपस्थितीची चर्चा?

Subscribe

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकानंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशाबाबत सर्वाधिक चिंता ही भाजपकडून व्यक्त करण्यात येतेय. परंतु कर्नाटकात सिद्धरामय्या यांचं सरकार आल्यानंतर भाजपला चांगलाच दणका बसलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा क्लास घेत त्यांना धडा शिकवला आहे.

नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाजपशासित राज्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपशासित राज्यांना १०० टक्के लोकसभा जागा जिंकण्याचे लक्ष मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे मोदींनी मुख्यमंत्र्यांना कर्नाटकच्या पराभवातून धडा घेण्यास सांगितले. यावेळी २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत १०० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष देण्यात आले आहे.

- Advertisement -

या सर्व राज्यांतील भाजपच्या संघटन स्थितीवरही चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांना भेटण्यास आणि त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यास सांगितले आहे. यासोबतच सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ३० मेपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या देशव्यापी जनसंपर्क अभियानाचे लक्ष दिले आहे.

- Advertisement -

योगींच्या अनुपस्थितीची चर्चा?

विशेष म्हणजे पीएम नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या या बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुपस्थिती लावली होती. त्यामुळे भाजपमध्ये राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. परंतु पंतप्रधानांना भेटून योगींनी त्यांची परवानगी घेतली आणि दिल्लीबाहेर गेले, असं भाजप नेत्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये उद्या विधान परिषदेच्या दोन जागांसाठी मतदान होणार असल्याचेही कारण पुढे केले जात आहे.

काल (रविवार) दुपारी ३ वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी उशीरापर्यंत चालली. या बैठकीत सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. मध्य प्रदेशातही नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आधीच काँग्रेसची सरकारं आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील सरकार वाचवण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.


हेही वाचा : बृजभूषण सिंह यांच्याऐवजी मला अटक का करताय? बजरंग पूनियाचा पोलिसांना सवाल


 

- Advertisment -