घरCORONA UPDATEचिंताजनक! देशात वायु प्रदूषण वाढल्यास कोरोना मृतांची संख्या ५.७ टक्क्यांनी वाढेल- रिसर्च

चिंताजनक! देशात वायु प्रदूषण वाढल्यास कोरोना मृतांची संख्या ५.७ टक्क्यांनी वाढेल- रिसर्च

Subscribe

भारतासह जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. यात भारतात विषाणूचा दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्थेचे भीषण रुप पाहायला मिळाले. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, अॅब्म्युलन्स, इंजेक्शन, बेड्स अभावी कोरोना रुग्ण तडफडून मरण पावले. भयानक बाब म्हणजे आता देशात कोरोनाचा तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. परंतु कोरोना विषाणूचा संबंध आता पर्यावरणाशी जोडला जात आहे. जल संपदा नष्ट करणे, जंगल तोड, मासांहार अशा अनेक घटकांशी कोरोनाचा संबंध असल्याचा दावा आता शास्त्रज्ञ करत आहेत. असे असतानाही देशातील हवामान बदल, हवा प्रदूषण आणि जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल-डिझेल-कोळसा या घटकांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. याचाच परिणाम आता देशाला भोगावा लागत असल्यासंदर्भात एक अहवाल टाईम्स या मासिकाने प्रसिद्ध केला आहे.

टाईम्सचा या अहवालानुसार, विज्ञान व पर्यावरण केंद्राचे कार्यकारी संचालक अनुमिता रॉय चौधरी यांनी सांगितले की, कोरोना महामारीचा वायु प्रदुषणाशी असलेला संबंध उघडकीस आणण्यात आला आहे. यातून असे स्पष्ट होते की, वायू प्रदूषणामुळे देशात कोरोना विषाणू पसरण्याचा धोका वाढत आहे.

- Advertisement -
 climate change impact on india corona crisis
चिंताजनक! देशात वायु प्रदूषण वाढल्यास कोरोना मृतांची संख्या ५.७ टक्क्यांनी वाढेल- रिसर्च

सध्या भारतातील अनेक शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणली जात आहेत. यामुळे या शहरांतील अनेक लोकांना वायू प्रदूषणामुळे श्वासासंबंधीत आजार उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग होत असल्याने अनेक रुग्णांच्या फुफ्फुसांची अवस्था गंभीर होत आहे.

भारतात वायू प्रदूषण आणि कोरोनाचा नेमका काय संबंध आहे याबाबत बरेच संशोधन करण्यात आले. परंतु यातून अपेक्षित गोष्टी साध्य झाल्या नाहीत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार्डियोवस्कुलर रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, लोकांना पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे पीएम प्रदूषणामुळे क्रॉनिक एक्सपोजर आजार होत आहे. पेंढा जाळणे, वाहनांचा धूर आणि उद्योगांच्या धुरामुळे देशात वायुप्रदूषण वाढत आहे. या वायु प्रदुषणामुळे ग्रस्त नागरिकांना कोरोना संसर्ग होत असल्याने जगात कोरोना विषाणूमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातील 15 टक्के लोक वायू प्रदूषणामुळे तसेच आधीच तीव्र आजारांनी ग्रस्त आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूमुळे मृत झालेल्यांपैकी 50 टक्के असे लोक आहेत ज्यांना आधीपासूनच वायु प्रदूषणासंबंधीत आजार आहेत. अस्थमा, दमा, टीबी, डायबिडीज किंवा इतर फुफ्फुसांसंबंधीत आजार असलेल्या व्यक्ती कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्या रुग्णाचे जगण्याची शक्यता कमी होत आहे. यात वाहनांतील पेट्रोल, डिझेलमुळे मोठ्याप्रमाणात सतत निघणार्‍या विषारी धुरामुळे देशात वायु प्रदुषणाची समस्या गंभीर असून नागरिक या विविध आजारांना बळी पडत आहे. दिल्लीत कोरोनाचा सुरुवातीपासूनच हिवाळ्या दिवसात नागरिक तोंडावर मास्क लावून फिर होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -