हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू

धर्मशाळा – हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकं मदतीसाठी आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. तसेच या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील भावनगरजवळ सकाळी 6 वाजता अचानक दरड कोसळल्याने NN-5 बंद करण्यात आला आहे. सकाळपासूनच राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. येथे स्थानिक प्रशासनाने ढिगारा हटवण्यासाठी अनेक मशीन बसवण्यात आल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये पाण्यासारखा वाहत असेलल्या डोंगराचा ढिगारा रस्त्यावर पत्यासारखा खाली येत असल्याचे दिसत आहे. तसेच हा मलबा महामार्गाच्या खाली असलेल्या खड्ड्यात पडताना दिसत आहेत. तसेच सगळीकडे दरड कोसळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. राज्यभरात 81 रस्ते ठप्प, 79 वीज ट्रान्सफॉर्मर ठप्प आणि 13 पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर प्रभाव पडला आहे. चंबा जिल्ह्यातील सरोग गावात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. दरड कोसळल्याने भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. किहार सेक्टरमधील दांड मुघल येथील भदोगा गावात रात्री उशिरा ही घटना घडली.


हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयावर विश्वास उरला नाही, कपिल सिब्बल यांचं धक्कादायक विधान