घरताज्या घडामोडीसामूहिक बलात्कार प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

सामूहिक बलात्कार प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

Subscribe

दिल्ली सरकारच्या वतीने मृत मुलीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्यात येणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. ९ वर्षीय दलित मुलीवर स्मशानात लैंगिक शोषण करुन तिची हत्या करण्यात आली. या मुलीच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भेट घेत सांत्वन केलं आहे. तसेच या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. तसेच पिडीतेच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले आहे. न्याया मिळवण्याच्या लढाईमध्ये केजरीवाल सरकार शेवटपर्यंत कुटुंबीयांसोबत असल्याचेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ९ वर्षीय मृत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांची भेट घेऊन केजरीवाल यांनी त्यांचे सांत्वन केलं आहे. तसेच केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, मुलीसोबत झालेली दुर्दैवी घटना अतिशय दुःखद आहे. मुलीला आपण पुन्हा आणू शकत नाही पण दिल्ली सरकार पिडीतेच्या कुटुंबीयांसोबत आहे. दिल्ली सरकारच्या वतीने मृत मुलीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच न्याय मिळवण्यासाठी मोठ्या वकिलांची फौज लावणार असून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्याची प्रचंड गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केजरीवाल यांनी आवाहन केलं आहे की, दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्या दिल्ली सरकार आपल्याला पूर्ण सहकार्य करेल. दिल्ली देशाची राजधानी आहे. दिल्लीतच अशा घटना घडत असतील तर देशात चांगला संदेश जात नाही यामुळे लोकांना असुरक्षित वाटत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

दिल्लीतील ओल्ड नांगलमध्ये ९ वर्षीय दलित मुलीवर स्मशानात सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. पिडीत स्मशानाच्या समोरच भाडेकरु म्हणून कुटुंबीयांसोबत राहत होती. दुपारच्या वेळी स्मशानातील वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी पिडीत मुलगी गेली होती. स्मशानातील पुजारी राधेश्याम आणि ४ आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार करुन मुलीची हत्या केली. कुटुंबीयांना काही समजू नये यासाठी कूलरचा करंट लागून मृत्यू झाला असल्याचा बनवा रचला तसेच पोलिसांना कळवले तर शवविच्छेदनादरम्यान अवयव काढून घेतील अशी भीतीही कुटुंबीयांना घातली. पुजाऱ्याने घाईने मुलीवर अंत्यसंस्कार केले मात्र मुलीच्या वडिलांनी मुलीचे ओठ काळे झाले असल्याचे पाहिले होते. यामुळे मुलीची हत्या केली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पुजारी आणि ४ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -