Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बंदुकीच्या निशाण्यावर असल्याने राणेंचा भाजपप्रवेश, अरविंद केजरीवालांची खोचक टीका

बंदुकीच्या निशाण्यावर असल्याने राणेंचा भाजपप्रवेश, अरविंद केजरीवालांची खोचक टीका

Subscribe

दिल्लीत संसदेचं कामकाज सध्या सुरू आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या दिवशी मोदी पंतप्रधान नसतील, त्या दिवशी देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असं विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

ईडी आणि सीबीआयने देशातल्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एका पक्षात एकत्र करून टाकलं आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी नारायण राणेंचाही उल्लेख केला आहे. ईडी आणि सीबीआयने नारायण राणेंच्या डोक्यावर बंदूक ताणली आणि विचारलं. त्यानंतर ते म्हणाले भाजपामध्ये यायचंय. सुवेंदू अधिकारी, मुकुल रॉय यांच्या डोक्यावरही अशीच बंदूक होती. कारण त्यांनी घोटाळे केले होते. देशातले सगळे चोर एकाच पक्षात भाजपामध्ये आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

हेमंत बिस्व शर्मांना डोक्यावर बंदूक ठेवून विचारलं तर ते म्हणाले भाजपात जायचंय. कारण त्यांनी चोरी केली. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांनी चोरी केलेली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये न जाता तुरूंगात जाणं पसंत केलं. कारण त्यांना माहिती आहे की, फारतर ६-७ महिने आत ठेवतील आणि नंतर बाहेर यायचंच आहे. काही केलंच नाही तर काय होणार? जामीन मिळणारच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा मिळेल, असं केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

मोदी आज पंतप्रधान आहेत. पण कधी ना कधी ते पायउतार होतीलच ना. ज्या दिवशी ते पायउतार होतील, त्या दिवशी देश भ्रष्टाचारमुक्त होतील. कारण चोर पकडण्यासाठी आता फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. हे सगळे एकाच खोलीत आणि पक्षात आहेत, असं केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा : वॉशिंग मशिनच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भाजपावर टीका


 

- Advertisment -