घरदेश-विदेश'त्यांची हिम्मत कशी झाली?', दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या घरी गेल्यावर काँग्रेस नेते...

‘त्यांची हिम्मत कशी झाली?’, दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या घरी गेल्यावर काँग्रेस नेते म्हणाले…

Subscribe

दिल्ली पोलिस राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलिस आल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिस राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलिस आल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपला संताप व्यक्त केलाय. गृह मंत्रालयाशिवाय आणि वरून निर्देश आल्याशिवाय पोलीस इथे पोहोचणे शक्य नाही, असं गेहलोत म्हणले. अखेर राहुलच्या घरी पोहोचण्याची दिल्ली पोलिसांची हिंमत कशी झाली? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

राहूल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर देऊ, असं राहुल गांधींनी सांगितलं होतं. तरीही पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. यापुढे बोलताना गेहलोत म्हणाले की, “लिसांना इथपर्यंत पोहोचण्याचं धाडस कसं झालं. संपूर्ण देश त्यांच्या या कारवाया पाहत आहे. देश त्यांना माफ करणार नाही. आजची कारवाई अत्यंत गंभीर आहे. चौकशी करण्यास कोणीही नकार देत नाही,”

- Advertisement -

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा राहुल गांधींना भेटण्याचा कार्यक्रम होता. शनिवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. बैठकीनंतर सीएम गेहलोत म्हणाले की, “काँग्रेस अध्यक्षांसोबत संघटना आणि इतर मुद्द्यांवर बैठक झाली आहे.” सीएम गेहलोत, अभिषेक मनु सिंघवी आणि पवन खेडा यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये एक वक्तव्य केलं होतं. यात्रेदरम्यान रडणाऱ्या अनेक महिला त्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या आणि आपल्यावर बलात्कार झाल्याचे त्यांनी सांगितल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं. ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी या संदर्भात माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश मिळाले नाही. ही यात्रा दिल्लीतूनही गेली होती, त्यामुळे आम्हाला त्याची माहिती हवी आहे. दिल्लीचे काही प्रकरण आढळल्यास तात्काळ कारवाई सुरू करू, असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -