घरताज्या घडामोडीPunjab Assembly Election 2022: केजरीवाल आधी चूक करतात नंतर माफी मागतात, पंजाबच्या...

Punjab Assembly Election 2022: केजरीवाल आधी चूक करतात नंतर माफी मागतात, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा टोला

Subscribe

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. चमकौर साहिबमधून निवडणुकीला सुरुवात करण्यापूर्वीच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी गुरु ग्रंथ साहिब यांचे धडे गिरवले आहेत. ही माझी चौथी निवडणूक आहे. अरविंद केजरीवाल यांनी सीमा ओलांडू नये. केजरीवाल आधी चुकी करतात नंतर माफी मागतात. गडकरी, जेटली आणि मजीठिया यांच्याशी त्यांनी माफी मागितली आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे, असं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले.

मुख्यमंत्री चन्नी यांचा केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, जेव्हा मी त्यांना काळा इंग्रज म्हणालो. तेव्हा ते म्हणाले की, का माझ्याशी संबंध ठेवायचा आहे का? असं प्रत्यूत्तर त्यांनी चन्नींना दिलं होतं. पंजाबमध्ये केजरीवालांचे २०० कोटींचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तसेच प्रसार माध्यमांमध्ये जाहिराती देखील सुरू आहेत. गोव्यापासून उत्तराखंडपर्यंत केजरीवालांचे होर्डिंग्ज लावले आहेत, हा पैसा येतो कुठून? असा प्रश्न मुख्यमंत्री चन्नी यांनी केजरीवालांना विचारला आहे.

- Advertisement -

मला मानहानीचा खटला भरावा लागेल

ईडीच्या छापेमारीच्या प्रश्नावर चन्नी म्हणाले की, ईडीला माझ्या घरातून पैसे मिळाले नाहीत. मला यामध्येच खेचणं योग्य नाहीये. मी सहन करू शकत नाही. मला मानहानीचा खटला भरावा लागेल. तीन महिने मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत मी अनेक कामं केली आहेत. असं चन्नी म्हणाले. दरम्यान, पंजाब विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.


हेही वाचा : IND vs SA 2nd ODI: शून्यावर उडाली विराट कोहलीची दांडी, ७१ व्या शतकाची वाढली प्रतीक्षा

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -