घरAssembly Battle 2022Punjab Elections 2022: सत्तेत आल्यावर एक लाख नोकऱ्यांचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Punjab Elections 2022: सत्तेत आल्यावर एक लाख नोकऱ्यांचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. तसेच उमेदवारांकडून जनतेला आश्वासनं देखील दिली जात आहेत. पंजाबमध्ये सुद्धा चुरशीची लढत सुरू आहे. येत्या २० फेब्रुवारी ११७ विधानसभेच्या मतदार संघासाठी निवडणूका होणार आहेत. परंतु या निवडणुकीदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मतदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता पुन्हा आली तर युवा तरूणांना एक लाख सरकारी नोकरी दिली जाणार, असं आश्वासन चरणजीत सिंग चन्नी यांनी दिलंय.

चन्नी यांनी आश्वासनं देताना आप पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय. आपने खोटी आश्वासने दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आप आदमी पार्टी दररोज खोटं बोलते. मलाच धक्का बसलाय की, ते एवढं खोटं कसे बोलू शकतात. ते कोणत्या परिवर्तनावर भाष्य करत आहेत. ते आहेत तरी कोण?, असं म्हणत चन्नी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

पंजाबसाठी विकास खूप महत्त्वाचा

पिठाची डाळ पोटाला आधार देते. परंतु पंजाबसाठी विकास खूप महत्त्वाचा आहे. राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणे खूप महाग झाले आहे. आम्ही सुशिक्षित आहोत कारण आमच्या आई-वडिलांनी खूप मेहनत केली आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की, सरकार आल्यानंतर संपूर्ण सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिलं जाणार आहे.

खासगी नोकरीसाठी गॅरन्टी

अकाली सरकारच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थी आणि शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या योजना काँग्रेसने पुन्हा एकदा सुरू केल्या. खासगी नोकरीसाठी एक गॅरन्टी योजना दिली जाणार आहे. मला ३ महिने मिळाले परंतु ५ वर्ष मिळाले तर एक लाख नोकरी देण्याची परवानगी देईन, असं चन्नी म्हणाले.

- Advertisement -

प्रत्येक वर्षात ८ गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार

राज्यातील अनेक लोकांकडे आरोग्यावर उपचारासाठी पैसे नाहीयेत. ज्या सेवा तुम्ही विदेशात पाहता, त्याच सेवा आम्ही येथे सुरू करणार आहोत. तसेच प्रत्येक वर्षात ८ गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आणि गरजू महिलांना प्रत्येक महिन्यात ११०० रूपये दिले जाणार, अशा प्रकारची आश्वासनं आणि घोषणा चन्नी यांनी केली आहे.


हेही वाचा : IPL 2022 Auction: श्रीसंतचे आयपीएल खेळण्याचं स्वप्न मोडलं, शॉर्टलिस्ट असूनही दुसऱ्यांदा धक्का


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -