एच. डी. कुमारस्वामींनी नाकारले पंतप्रधान मोदींचे फिटनेस चॅलेज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले फिटनेस चॅलेंज कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नाकारले आहे. मला राज्याच्या तब्येतीची काळजी जास्त आहे असे सांगत कुमारस्वामी यांनी मोदींचे फिटनेस चॅलेंज नाकारले आहे. मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. पण, राज्याची तब्येत देखील महत्त्वाची आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज असल्याचे ट्विट कुमारस्वामी यांनी केले आहे.

कुमारस्वामींनी नाकारले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फिटनेस चॅलेंज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले फिटनेस चॅलेंज कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नाकारले आहे. मला राज्याच्या तब्येतीची काळजी जास्त आहे असे सांगत कुमारस्वामी यांनी मोदींचे फिटनेस चॅलेंज नाकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस चॅलेंज दिल्यानंतर कुमारस्वामी यांनी माझ्या तब्येतीची काळजी दाखवल्याबद्दल आभारी आहे. मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो. पण, राज्याची तब्येत देखील महत्त्वाची आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज असल्याचे ट्विट कुमारस्वामी यांनी केले आहे.


हम फिट तो इंडिया फिट!

क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ‘हम फीट तो इंडिया फीट’ हा हॅशटॅग वापरत क्रिकेटर विराट कोहलीला फिटनेस दाखवण्याचे चॅलेंज दिले. त्यानंतर विराट कोहलीने देखील आपला फिटनेस व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला फिटनेस दाखवण्याचे चॅलेंज दिले. विराटच्या चॅलेंजला प्रत्युत्तर देत मोदी यांनी ट्विटरवर आपला फिटनेस व्हिडीओ अपलोड केला. त्यानंतर मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रासह चाळीशी ओलांडलेल्या IAS अधिकाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिले. पण, कुमारस्वामी यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चॅलेज नाकारले आहे.