घरदेश-विदेशपंजाब, महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंजाब, महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

बाबा जोरावर सिंग व बाबा फत्तेसिंगची यांच्या वीरतेचा सन्मान करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने वीर बाल दिवसचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, पंजाब व महाराष्ट्रात वीर व संत जन्माला आले. संत नामदेव हे पंजाबला गेले होते. तर गुरु गोविंद सिंग हे महाराष्ट्रात आले होते. नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांचा भव्य गुरुद्वारा आहे. त्यामुळे पंजाब व महाराष्ट्राचे अनोखे नाते आहे.

नवी दिल्लीः पंजाब व महाराष्ट्राची भूमी संतांना व विरांना जन्म देणारी आहे. चाफेकर बंधू, राजगुरु सारखे क्रांतीकारी महाराष्ट्रात जन्माले आले तर भगतसिंगसारखे क्रांतीकारी पंजाबमध्ये जन्माले आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिल्ली येथे केले.

बाबा जोरावर सिंग व बाबा फत्तेसिंगची यांच्या वीरतेचा सन्मान करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने वीर बाल दिवसचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, पंजाब व महाराष्ट्रात वीर व संत जन्माला आले. संत नामदेव हे पंजाबला गेले होते. तर गुरु गोविंद सिंग हे महाराष्ट्रात आले होते. नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांचा भव्य गुरुद्वारा आहे. त्यामुळे पंजाब व महाराष्ट्राचे अनोखे नाते आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, अनेक क्रांतीकारी पंजाब व महाराष्ट्राने देशाला दिले आहेत. राजगुरु व चाफेकर बंधू हे महाराष्ट्रातले होते तर भगतसिंग हे पंजाबचे होते. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या शौर्याचा वारसा आहे. तसेच पंजाबला गुरु गोविंद सिंग व गुरु नानक यांचा वारसा आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४ साली मुंबईतील शिख धर्मीयांचे रक्षण केले होते, याची आठवणही मुख्यमंत्री शिंदे यांनी करुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील विरांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळेच आज भारताची मान जगभरात उंचवली आहे. जी-२० चे यजमानपद भारताला मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रालाही चांगली संधी दिली आहे, असे मतही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी सकाळी अचानक दिल्लीला निघून गेले. त्यावरून अनेक तर्कविर्तक झाले. उद्धव ठाकरे यांनी यावरुन विधानपरिषदेत हल्लाबोल केला. मात्र ते वीर बाल दिवसाच्या कार्यक्रमाला दिल्लीला गेले आहेत. ते दुपारी महाराष्ट्रात परततील व कर्नाटक सीमावादाचा ठराव मांडतील, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -