घरताज्या घडामोडी'खेला होबे'! भाजपच्या पराभवाची सुरुवात 2024 मध्ये बंगालमधून होणार, ममता बॅनर्जींचं मोठं...

‘खेला होबे’! भाजपच्या पराभवाची सुरुवात 2024 मध्ये बंगालमधून होणार, ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

Subscribe

भाजपच्या पराभवाची सुरुवात 2024 मध्ये बंगालमधून होणार असल्याचं मोठं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत, आता अखिलेश यादव, नितीशकुमार, हेमंत सोरेन हे सगळे एकत्र आले आहेत. ज्यांना 275-300 जागांचा अभिमान आहे त्यांनी लक्षात ठेवावे की, राजीव गांधी यांच्याकडे 400 जागा होत्या. त्यांना सांभाळताही येत नव्हते. जे 300 बद्दल बोलत आहेत त्यांना या 5 राज्यांमध्ये 100 जागांचा झटका बसणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

2024 मध्ये भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीतील सर्व पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा केली आहे. हीच प्रमुख आघाडी असेल, असे त्यांनी सांगितले आहे. 2024 च्या निवडणुकांपूर्वी विरोधकांना एकत्र करण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

- Advertisement -

नितीश कुमार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, जेडीयूचे एचडी कुमारस्वामी, सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे डी राजा, इंडियन नॅशनल लोक दलाचे ओमप्रकाश चौटाला आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली आहे.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाच्या वतीने कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. काँग्रेस नेते 3500 किलोमीटरची पदयात्रा काढून भाजप सरकारविरोधात देशभरात आंदोलन सुरू करणार आहेत.


हेही वाचा : …आता सहन होत नाही, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आमदार राजू पाटलांचा संताप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -