घरताज्या घडामोडीभाजपचं अस्तित्वच पुसून टाकायचंय, नितीश कुमारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

भाजपचं अस्तित्वच पुसून टाकायचंय, नितीश कुमारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कोलकातामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर नबन्ना येथे नितीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत आमच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपचं अस्तित्वच पुसून टाकायचंय, असं मोठं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

आम्ही सगळे एक आहोत. माझी काहीच हरकत नाही. देशातील जनता भाजपच्या विरोधात लढेल. नितीश कुमार आणि आमची विकासकामांबाबत चर्चा झाली आहे. राजकारणावरही चर्चा झाली आहे. परंतु ज्याप्रकारे जयप्रकाश जी यांच्या आंदोलनाची सुरूवात बिहारमधून झाली आहे, त्याचप्रमाणे आपणही बिहारमध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. यावरून पुढील भूमिका ठरवता येईल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisement -

माझा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही. मला कोणताही अहंकार नाही. मला भाजपचं अस्तित्वचं पुसून टाकायचंय. मीडियाच्या माध्यमातून आणि खोटं बोलून भाजप पक्ष हिरो बनला आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भाजपच्या विरोधात सर्वांना सतर्क राहावं लागणार आहे. त्यामुळे या सर्वांशी आमची चर्चा सुरू आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आमचे जुने नाते आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र यावं. जे देशाच्या हिताचं असेलं. आता जे लोकं राज्य करत आहेत. त्यांना देशहिताशी काहीही देणंघेणं नाहीये. ते फक्त आपल्या प्रसिद्धीसाठी करत आहेत, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisement -

कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीदरम्यान बिहारचे मंत्री संजय झा हेही उपस्थित होते. दीदींची भेट घेतल्यानंतर तिन्ही नेते उत्तर प्रदेशला जाणार आहेत. लखनौ येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी विरोधी ऐक्याबाबत चर्चा करणार आहेत.


हेही वाचा : मोहम्मद शहाबुद्दीन बांगलादेशचे 22 वे राष्ट्रपती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -