घरताज्या घडामोडीआम्ही वाट पाहतोय... 2024मधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नितीश कुमारांनी दिले संकेत

आम्ही वाट पाहतोय… 2024मधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नितीश कुमारांनी दिले संकेत

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2024मध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या भूमिकेवर संकेत दिले आहेत. 2024मध्ये पंतप्रधान होण्याच्या इच्छेवर त्यांनी भाष्य जरी केलं नसलं तरी त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका मांडत केंद्र सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे. नितीश कुमार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्षातील जास्तीत जास्त लोकांची एकजूट व्हावी ही माझी इच्छा आहे. लोकं एकत्र आल्यानंतर ताकदीने लोकसभा निवडणूक लढू. याच संधीची आम्ही वाट पाहत आहोत. मी दिल्लीला देखील जाऊन आलो आहे. प्रत्येक विरोधी पक्षाला निर्णय घेण्यास सांगितले आहे, असं नितीश कुमार म्हणाले.

कोणाला काही अडचण असल्यास त्याचीही दखल घेतली जात आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे वर्णन भ्रष्टाचारी लोकांचा समूह म्हणून केले. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, अटलजींचे युग राहिले नाही. त्यांच्यावर खूप विश्वास होता. आम्ही त्यांची स्तुती करायचो. आता प्रत्येकजण स्वतःची प्रशंसा करण्यात व्यस्त आहे, असंही नितीश कुमार म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधींच्या मुद्द्यांवर सोडले मौन

नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या मुद्द्यावरही मौन सोडले. ते म्हणाले की, ज्येव्हापासून आम्ही राजकारणात आहोत. तेव्हापासून कोर्टाच्या बाबतीत काही केसेस किंवा गुन्हा असल्यास आम्ही त्यावर बोलत नाही. माझ्याबाबतीत काही घडलं तर मी काही बोलतो का?, माझी न बोलण्याची सवयच आहे, असं कुमार म्हणाले.

- Advertisement -

या सगळ्यावर काय बोलायचे. प्रत्येकाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. आम्ही टीका करत नाही. मला कोणत्याही खटल्यात, भांडणात ढवळाढवळ करायला आवडत नाही. 17 वर्षांपासून सरकार चालवत आहे. जर कोणाची चौकशी होत असेल तर आम्ही कधीही भाष्य केले नाही. आम्ही म्हणतो नीट तपास करा. म्हणूनच मी या गोष्टींवर कधीही प्रतिक्रिया देत नाही, असंही नितीश कुमार म्हणाले.


हेही वाचा : पोलिसांचा ससेमिरा असतानाच खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा पहिला व्हिडीओ समोर, म्हणाला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -