घरदेश-विदेशअशोक गेहलोत सोनिया गांधींची घेणार भेट, म्हणाले...तरच लढवणार निवडणूक

अशोक गेहलोत सोनिया गांधींची घेणार भेट, म्हणाले…तरच लढवणार निवडणूक

Subscribe

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अशोक गेहलोत आज सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत येणार आहेत. ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

  • मंगळवारी अशोक गेहलोत यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. बुधवारी ते दिल्लीत येणार आहेत.
  • अशोक गेहलोत यांनी मंगळवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आमदारांना दिल्ली गाठण्याचा संदेश मिळेल, असेही सांगितले.
  • गेहलोत यांच्या मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्री गेहलोत आधी कोचीला जाऊन राहुल गांधींना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा आग्रह करतील. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, त्यांना अध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यास सांगितले तर ते आमदारांना कळवतील.
  • अशोक गेहलोत पुढील आठवड्यात काँग्रेस अध्यक्षपदासाठी फॉर्म भरू शकतात, असे बोलले जात आहे.
  • मुख्यमंत्री अशोक गेहलोत निवडणूक लढवणार आहेत. पण राजस्थानवर त्यांची पकड कायम ठेवायची आहे.
  • गेहलोत हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच मुख्यमंत्री राहू शकतात, असा फॉर्म्युला तयार केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
  • दुसरीकडे राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राजस्थान, छत्तीसगड, गुजरातनंतर आता जम्मू-काश्मीर काँग्रेस कमिटीने राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
  • काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार असून, 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे.
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
  • मतदान संपल्यानंतर 19 ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -