दिल्लीत आजी माजी मंत्र्यासोबत ठाकरे शहा यांची स्नेहभोजनच्या आड गुफ्तगू

नवी दिल्लीतील बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आजी माजी मंत्री एकत्र स्नेहभोजन करताना दिसले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथील सभेत बोलताना आजी माजी मंत्री आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. ठाकरे यांच्या या उल्लेखामुळे राजकीय वर्तृळात विविध चर्चांना उधाण आलं. यात भविष्यात शिवसेना भाजप एकत्र येण्यापासून ते विरोधी पक्षातील आजी माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश होण्यापासून सगळेच तर्क लढवले गेले. पण नवी दिल्लीतील बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आजी माजी मंत्री एकत्र स्नेहभोजन करताना दिसले. यावेळी त्यांच्यात चर्चाही झाल्याची माहिती आहे. पण चर्चा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर झाली ते मात्र कळालेले नसून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आजी माजी मंत्र्याच्या उल्लेखाशी या स्नेहभोजनाच काही कनेक्शन आहे का यावर आता चर्चा रंगत आहे.

नवी दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्रालयाने. नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्याच्या बैठकीचे आयोजन केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री उ्द्धव ठाकरे , बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीस हजर होते. यावेळी नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमात अमित शाह, उद्धव ठाकरे, शिवराज सिंह चौहान, नितिश कुमार एकाच टेबलावर शेजारी बसलेले होते. तसेच त्यांच्यात गंभीर विषयावर चर्चा सुरू असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून वाटले. पण ही चर्चा नक्की नक्षलवादी कारवायासंदर्भात होती की भविष्यातील राजकीय घडामोडींची हे मात्र गुलदस्त्यातच राहीले. विशेष म्हणजे यातील सगळेच मंत्री कधी ना कधी एकमेकांचे सहकारी राहीलेले आहेत. यामुळे ठाकरे यांच्या त्या उ्ललेखामागे नक्कीच काहीतरी राजकीय संदेश असणार असा तर्क लढवला जात आहे.