घरताज्या घडामोडीउत्तर प्रदेशातील रस्त्यांवरील धार्मिक कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील रस्त्यांवरील धार्मिक कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

Subscribe

राज्यासह उत्तर प्रदेशात देखील भोंग्याचा विषय मोठा प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे. युपीमध्ये धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर कुठलेही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, अशी माहिती सरकारी प्रवक्त्यांनी देण्यात आली आहे.

रस्त्यांवर कोणत्याही धार्मिक पद्धतीचे कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊ नका, अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम हे संबंधित धार्मिक स्थळांमध्येच व्हायला हवेत, रस्त्यांवर नाही, असे स्पष्ट निर्देश योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्रात मनसेच्या गुढी पाडवा सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढत ते उतरवले गेले पाहिजेत अन्यथा त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र देशभरात उमटले आहेत.

- Advertisement -

योगींच्या भोंगे उतरवण्याच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं. तसेच रस्त्यावर धार्मिक कार्यक्रम होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली असून त्यासंबंधीत स्पष्ट निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच त्यांनी ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी त्यांच्याविरोधात अयोध्येत पोस्टरबाजी केली जात आहे. राज ठाकरे परत जा, या मथळ्याखाली पोस्टरबाजी अयोध्येत केली जात आहे. तसंच, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी विरोध कायम ठेवला आहे. अशातच मनसैनिकांनी भाजप खासदार बृजभूषण सिहं यांना फोन करून त्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : धक्कादायक! धावत्या रेल्वेत तरूणीची गळफास घेवून आत्महत्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -