UP CM योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस यंत्रणाकडून तपास सुरु

गोरखपुर मंदिराच्या मठात आठ जागांमध्ये सुलेमान भाईने बॉम्ब लावला आहे. तसेच मेरठमध्ये बॉम्ब लावला असल्याची धमकी ट्विटमधून दिली आहे.

CM Yogi adityanath get bomb blast threat and Gorakhpur mandir
UP CM योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलीस यंत्रणाकडून तपास सुरु

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन या ट्विटर हँडलवरुन बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. धमकीनंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गोरखनाथ मंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप नेत्यांना धमकी मिळाली आहे. धमकीच्या वृत्तानंतर उत्तरप्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. मेरठमध्येही बॉम्बस्फोट करण्याबाबतचे संभाषण या ट्विटरवरुन करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी गोरखनाथ मंदिरात तपास सुरु केला असून पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी मिळाल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. लेडी डॉन नावाच्या ट्विटर हँडलवरुन ही धमकी दिली गेली आहे. ट्विटमध्ये असे म्हटलं आहे की, उत्तर प्रदेश विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर बॉम्ब लावण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही धमाक्यात जीव जाईल. तर दुसऱ्या ट्विटमध्ये असे म्हटलं आहे की, गोरखपुर मंदिराच्या मठात आठ जागांमध्ये सुलेमान भाईने बॉम्ब लावला आहे. तसेच मेरठमध्ये बॉम्ब लावला असल्याची धमकी ट्विटमधून दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यानथ गोरखपूर दौऱ्यावर असताना धमकी देण्यात आली आहे. यानंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी मंदिरातील सर्वभागामध्ये तपासणी केली आहे. गोरखपुर एसएसपी डॉ. विपिन ताडा म्हणाले की, धमकीचे ट्विट समोर आल्यानंतर मंदिराच्या आणि बाजूच्या परिसरात तपास करण्यात आला. परंतु काही संशयास्पद आढळलं नाही. खोडसाळपणे कोणीतरी ट्विट केलेलं दिसत आहे. याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल.

उत्तर प्रदेशमधील अन्य भाजप नेत्यांवर आरडीएक्सने हल्ला करण्यात येईल असेही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ले़डी डॉनच्या या ट्विटर हँडलबाबत माहिती गोळा कऱण्यासाठी पोलीसांचे सायबर पथक कार्यरत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापुर्वीदेखील धमकी देण्यात आली होती.


हेही वाचा : pakistan tribute lata mangeshkar : ‘जगाने एक महान गायक गमावला’ लतादीदींच्या निधनामुळे पाकिस्तान हळहळला