Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहाचे काम १ जूनपासून सुरू होणार, CM योगी राहणार उपस्थित

Yogi government Ban on sale of liquor in Ayodhya and Mathura
अयोध्या आणि मथुरेत दारु विक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीला वेग आला आहे. १ जूनपासून मंदिराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. या गर्भगृहाच्या बांधकामाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. योगी उपस्थित राहणार असून एक दगड ठेवतील यानंतर बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मंदिराचे बांधकाम २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०२० मध्ये राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गर्भगृहाच्या बांधकामासाठी पहिला दगड ठेवतील. श्री राम मंदिराचा चबुतरा उभारण्यासाठी एकूण १ लाख ७० हजार ग्रेनाईट दगडांची गरज लागणार आहे. परंतु यामध्ये आतापर्यंत ५ हजार दगडांचा वापर करण्यात आला आहे.

लवकरच गर्भगृह आणि त्याच्या आजूबाजूला कोरीव वाळूचे दगड टाकण्यास सुरुवात होईल. प्लिंथचे काम आणि कोरीव दगड बसविण्याचे काम एकाच वेळी सुरू राहणार आहे. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील बन्सी-पहारपूर भागातील डोंगरावरील गुलाबी वाळूचा दगड म्हणजेच गुलाबी ग्रेनाईट दगड मंदिराच्या बांधकामासाठी वापरला जात आहे. मंदिरात सुमारे 4.70 लाख घनफूट कोरीव दगड वापरण्यात येणार आहेत. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा शहरातून कोरीव दगड अयोध्येपर्यंत आता पोहोचू लागले आहेत. तसेच मंदिराच्या गर्भगृहात राजस्थानच्या मकराना टेकड्यांचा पांढरा संगमरवर वापरण्यात येणार आहे. मकराना संगमरवरी कोरीव काम प्रगतीपथावर असून यापैकी काही संगमरवरी खोदकाम अयोध्येत पोहोचू लागले आहेत.

मंदिराच्या नियोजित जागेच्या आणि आजूबाजूच्या सुमारे 6 एकर जागेतून सुमारे 1.85 लाख घनमीटर माती तसेच मलबा काढण्यात आला. या कामाला सुमारे 3 महिने लागले (जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2021). हा भाग एका मोठ्या खुल्या खाणीसारखा दिसत होता. गाभार्‍यात 14 मीटर खोली आणि त्याच्या बाजूने 12 मीटर खोली करताना वाळू हटवल्यामुळे तिथे एक मोठा खोल खड्डा तयार झाला आहे.

या मंदिराच्या प्रकल्पात परकोटा (कोरीव वाळूचा खडक) दगडांचे प्रमाण सुमारे 8 ते 9 लाख घनफूट, नक्षीदार ग्रॅनाइट प्लिंथसाठी 37 लाख घनफूट, सुमारे 4.70 लाख घनफूट कोरीव गुलाबी वाळूचा दगड मंदिरासाठी वापरला जाईल. गर्भगृहाच्या बांधकामासाठी 13,300 घनफूट मकराना पांढरा कोरीव संगमरवरी आणि 95,300 चौरस फूट फ्लोअरिंग आणि क्लॅडिंगसाठी वापरला जाईल.

मंदिराच्या बांधकामाची सर्व कामे एकाच वेळी प्रगतीपथावर सुरु आहेत. गर्भगृहाभोवती प्लिंथचे बांधकाम, कोरीव गुलाबी वाळूचे दगड, पिंडवारामध्ये गुलाबी दगड, मकराना संगमरवरी कोरीव काम आणि दक्षिणेकडे आरसीसी रिटेनिंग भिंतचे बांधकाम सुरु आहे. गर्भगृहाचे व्यासपीठ सप्टेंबर महिन्यांपर्यंत तयार करायचे आहे. यासह मंदिराचे बांधकाम सुरुच राहणार आहे.


हेही वाचा : Rajya Sabha Polls: राज्यसभा निवडणुकीसाठी 15 राज्यांतील 57 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज, यूपीच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार