घरक्रीडाप्रशिक्षक रवी शास्त्रींना कर्णधार विराट कोहली पेक्षाही जास्त पगार!

प्रशिक्षक रवी शास्त्रींना कर्णधार विराट कोहली पेक्षाही जास्त पगार!

Subscribe

विशेष म्हणजे वेतन वाढ झाल्यास प्रशिक्षक रवि शास्त्री हे कर्णधार विराट कोहलीपेक्षाही जास्त वेतन घेतील.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या पगारात २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे वार्षिक वेतन किमान १० कोटी रुपये होऊ शकते. विशेष म्हणजे वेतन वाढ झाल्यास प्रशिक्षक रवि शास्त्री हे कर्णधार विराट कोहलीपेक्षाही जास्त वेतन घेतील.

प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या कान्ट्रॅक्टमध्ये वर्ष २०२१ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच त्यांचा पगारदेखील वाढणार आहे. त्यामुळे वेतनवाढ झाल्यास प्रशिक्षक रवि शास्त्री यांना वर्षाला ९.५ ते १० कोटी रुपये वेतन मिळेल अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. एका रिपोर्टच्या वृत्तानुसार रवि शास्त्री यांच्याबरोबर नवीन कॉन्ट्रॅक्ट करताना त्यांना २० टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. या निर्णयाला बोर्डाची देखील सहमती आहे. यापूर्वीच्या कॉन्ट्रक्टप्रमाणे प्रशिक्षक रवि शास्त्री यांना वर्षाला ८ कोटी रुपये वेतन देण्यात येत होते.

- Advertisement -

हेही वाचा – पाहा – ऐश्वर्या राय- बच्चनच्या डोहाळे जेवणाचे फोटो

सपोर्ट स्टाफलासुद्धा वेतनवाढ

प्रशिक्षक रवि शास्त्रींप्रमाणेच सपोर्ट स्टाफलाच्या वेतनातसुद्धा वाढ झाली आहे. यामध्ये गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना वर्षाला किमान ३.५ कोटी रुपये वार्षिक देण्यात येणार आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना सुद्धा भरत अरुण यांच्या एवढेच वेतन मिळणार आहे. तर भारतीय संघाचे नवे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांना २.५ ते ३ कोटी रुपये वेतन मिळेल.

कर्णधार विराट कोहलीला मिळतात ७ कोटी

बोर्डच्या सध्याच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा A+ लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये वेतन देण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -