India Coal Crisis : पॉवर ब्लॅकआऊट टळणार? कोल इंडियाचा दिवसापोटी २७० रॅक कोळशाचा पुरवठा

coal india is supplying 279 rakes of coal per day to power companies as against 319 rakes
India Coal Crisis : पॉवर ब्लॅकआऊट टळणार ? कोल इंडियाचा दिवसापोटी २७० रॅक कोळशाचा पुरवठा

वीज संकटावर मात करण्यासाठी देशात कोल इंडिया कंपनीकडून सातत्याने कोळश्याचा पुरवठा वाढवला जात आहे. यात कोळश्याचे रॅक सतत वाढत आहेत. यात बुधवारी सकाळपर्यंत कोल इंडियाची उपकंपनी बीसीसीएलने कोळसा पुरवण्याचे लक्ष्य साध्य केले आहे. कोल इंडियाने वीज क्षेत्रांना ३१० रॅक कोळश्याचा पुरवठा करण्याचे लक्ष ठेवले आहे. सध्या २७९ रॅक पाठवले जात आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा ३० ते ३५ रॅक अधिक आहे. पुरवठ्याचे उद्दिष्ट ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एका रॅकमध्ये सुमारे चार हजार टन कोळसा भरला जातो. त्यामुळे देशावरील पॉवर ब्लॅकआऊटचे संकट टळण्याची शक्यता आहे.

मात्र गुलाब चक्रीवादळाचा फटका कोल इंडियाच्या बहुतेक खुल्या खाणींना सहन करावा लागला. परिणामी कोळशाच्या खाणी असलेल्या गावांमध्ये महापूरचे संकट निर्माण झाले. आणि या कोळशाच्या खाणींमध्येही पुराचे पाणी शिरले. कोळशाचे साठे पुरेसे असले तरी याचा परिणाम उत्पादनावर झाला. दरम्यान, वीज क्षेत्रात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली.

वीज कंपन्यांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कडक सूचना

कोल इंडियाने सर्व उपकंपन्यांना आदेश दिल्या की, वीज कंपन्यांना कोळशाची कमतरता होऊ देऊ नये. या प्रकरणाची आता रेल्वे मंत्रालयाने देखील दखल घेतली आहे. रेल्वे मंत्रालयाने कोल इंडियाच्या मागणीनुसार रॅक देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोळसा कंपन्यांकडून पुरवठा सातत्याने वाढवला जात आहे, तरीही कोल इंडियाकडे अजूनही ३९.१३ हजार टन कोळशाचा साठा शिल्लक आहे. याशिवाय खाणींमधून पाणी काढण्याचे कामही वेगाने सुरु करण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

लक्ष्य साध्या होईपर्यंत पाठवले जाणरा रॅक

१) कंपनी रॅक पुरवठ्याचे लक्ष्य करत आहे.
२) ईस्टर्न कोलफील्ड लि. (ईसीएल) २१ १६
३) भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) २४ २४
४) सेंट्रल कोलफील्ड लिमिटेड (सीसीएल) ४६ ४०
५) नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड (एनसीएस) ३५ ३३
६) वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (डब्यूसीएल)३२ २६
७) साऊथ ईस्ट कोलफील्ड लि. (एसईसीएल) ५० ४७
८) महानदी कोलफील्ड लि. (एमसीएस) १०२ ९३

महत्वपूर्ण तथ्य

कोल इंडियाने १९.२० लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या १६.०२ लाख टन कोळश्याचे उत्पादन होत आहे.
कोल इंडियाने १९.८० लाख कोळसा पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या १८. ८२ लाख टन कोळसा पाठवला जात आहे.

रेल्वेचे स्पेशल कॉरिडॉर

देशाला वीज संकटापासून वाचवण्यासाठी रेल्वे कोल इंडियासोबत काम करत आहे. कोळसा कंपन्यांकडून वीज कंपन्यांना कोळशाचा अखंड पुरवठा करण्यासाठी रेल्वेने एक स्पेशल कॉरिडॉर तयार केला आहे. सध्या, कोळश्याने भरलेल्या मालगाड्यांना प्राधान्याच्या आधारावर पास दिले जात आहेत.