घरताज्या घडामोडीCoronavirus: 'या' गावात कोरोनाशी लढण्यासाठी छत्री बनवले शस्त्र!

Coronavirus: ‘या’ गावात कोरोनाशी लढण्यासाठी छत्री बनवले शस्त्र!

Subscribe

केरळमधील एका गावात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अनोखी शक्कल वापरली आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ५८ हजारांहून अधिक झाला आहे. दरम्यान केरळ राज्यातील एका गावात कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी लोकांनी छत्रीला शस्त्र बनवले आहे. केरळच्या किनारपट्टीवरील जिल्हा अलाप्पुझ्हा येथील थांनीर्मुक्कोम खेड्यातील लोकांनी या उन्हाळ्यात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी छत्रीला सोशल डिस्टन्सिंगचे प्रभावी शस्त्रे मानले आहे.

या तीन महिन्यांच्या पावसाळ्यात लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी ही युक्तीचा चांगला फायदा होईल असे ग्रामस्थांचे मत आहे. थांनीर्मुक्कोम पंचायतचे अध्यक्ष पीएस ज्योती म्हणाले की, आमच ब्रीदवाक्य आहे, ‘छत्री उघडा, मग पाऊस, उन्ह किंवा महामारी असो.’

- Advertisement -

या अंतर्गत एका महिन्यात प्रशासनाने सवलतीच्या दराने सहा हजार छत्र्यांचे वाटप केले आहे. त्याच वेळी ही युक्ती सांगणार अलाप्पुझ्हाचे आमदार आणि राज्याचे अर्थमंत्री डॉ.टी.एम थॉमस इस्साक म्हणाले की, छत्री उघडल्यामुळे दोन लोकांमध्ये एक मीटर अंतर असेल.

आतापर्यंत केरळ मध्ये १,००४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ५५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ५६,९४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राच्या पाठोपाठ तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान या राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – व्हिएतनाम: मंदिर परिसरातील उत्खननादरम्यान ९व्या शतकातील सापडले शिवलिंग!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -