घरदेश-विदेशCoronavirus: कोरोनाचा नायनाट करु शकतो सर्दी, खोकल्याचा विषाणू- संशोधनातील दावा

Coronavirus: कोरोनाचा नायनाट करु शकतो सर्दी, खोकल्याचा विषाणू- संशोधनातील दावा

Subscribe

देशासह जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत रुग्णसंख्या सतत वाढत आहे. अनेक संशोधक कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. दरम्यान एका संशोधनात कोरोना विषाणूचा नायनाट करण्याची क्षमता सर्दी, खोकल्याच्या विषाणूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. युनिर्वसिटी ऑफ ग्लास्गोतील वैज्ञानिकांनी सर्दी, खोकल्याचा राइनो विषाणू कोरोना विषाणूला नष्ट करु शकतो असा दावा केला आहे.

वैज्ञानिकांचे मत आहे की, राइनो विषाणूचा मानवी शरारीतील प्रभाव काही वेळ असला तरी तो शरारीत अशाप्रकारे पसरतो ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यास मदत होते. परंतु हा रिसर्च सामान्य परिणामांवर आधारित आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर संशोधनानुसार प्रभाव दिसेल असे म्हणणे योग्य नाही. तसेच सर्दी, खोकल्याचा विषाणू शरीरात असल्यास तो व्यक्तीला कोरोनापासून सुरक्षित करेल असे म्हणता येणार नाही. त्यामुळे यावर डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान इन्फ्लुएंजा (सर्दी. खोकला, ताप) विषाणू अधिक स्वार्थी विषाणू आहे. सामान्यत: हे विषाणू मानवी शरीरावर एकट्यानेच संक्रमण करतात, तर न्यूमोनिया आणि ब्राँकायटिससारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या एडेनो व्हायरससारख्या विषाणूमुळे इतर संसर्ग होण्याची शक्यताही कमी असते.

कोविडसाठी जबाबदार असलेला सार्स-Cov-2 हा विषाणू इतर विषाणूंशी कसा वागतो किंवा कसा परिणाम करतो याविषयी अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करत आहेत, परंतु हा अभ्यास खूपच आव्हानात्मक आहे.

- Advertisement -

ग्लास्मो सेंटर फॉर व्हायरस रिसर्च टीमने यावर अभ्यास करण्यासाठी मानवी श्वसन प्रणालीसारखे एक रचना आणि पेशी तयार केल्या. वैज्ञानिकांनी त्यात कोरोना विषाणूचा सार्स-Cov-2 विषाणू आणि सर्दी- खोकल्याचा राइनो विषाणू एकत्र सोडले. या प्रयोगात सार्स-Cov-2 विषाणूवर राइनो विषाणूने यशस्वीरित्या मात केली. प्रयोगात असे आढळले आहे की. जर संसर्गाच्या पहिल्या 24 तासांत राइनो विषाणू प्रभावी झाला असेल तर सार्स-Cov-2 चा परिणाम होण्याची शक्यता फारच कमी असते. तसेच 24 तासांनंतर सार्स-Cov-2 विषाणू शरीरात गेला असेल तरी राइनो विषाणू त्यास बाहेर टाकतो.

या रिसर्च टीमचे सदस्य असलेले डॉक्टर पाब्लो म्युरिका सांगतात, “राइनो विषाणू सार्स-Cov-2 विषाणूला नष्ट करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. त्यामुळे राइनो विषाणू सार्स-Cov-2 विषाणूचा नायनाट करण्यासाठी यशस्वी होतो. हा प्रयोग खूपच उत्साहवर्धक आहे कारण जर राइनो विषाणूचा मानवी शरीरावर चांगला परिणाम झाला तर ते सार्स-Cov-2 विषाणूचा संसर्ग रोखू शकेल.”

असे प्रयोग यापूर्वीही करण्यात आले होते. २००९ मध्ये राइनो विषाणूच्या संसर्गामुळे युरोपमधील बर्‍याच भागांमध्ये स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यात यश आले. या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, राइनो विषाणू संक्रमित शरारीतील पेशींमुळे मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असून ज्याने सार्स-Cov-2 ची संसर्गजन्य क्षमता कमकुवत केली. युनिर्व्हसिटी ऑफ़ ग्लास्गोचे संशोधन ‘जर्नल ऑफ़ इन्फ़ेक्शस डिजीजमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.


Corona Update : मे महिन्याची सुरुवात देशासाठी चिंताजनक, रुग्णसंख्या गाठणार ४ लाखांचा टप्पा, तज्ञांचा दावा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -