घरताज्या घडामोडीसर्वोच्च न्यायालयासाठी तीन महिला सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस, कॉलेजियमची यादी जाहीर

सर्वोच्च न्यायालयासाठी तीन महिला सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस, कॉलेजियमची यादी जाहीर

Subscribe

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती.

कॉलेजियमकडून सर्वोच्च न्यायालयासाठी ९ न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली आहे. यामध्ये ३ महिला न्यायाधीशांची शिफारस प्रथमच करण्यात आली आहे. देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी सर्वोच्च न्यायालयात रिक्त असलेल्या न्यायाधीशांच्या पदांवर नियुक्तीबाबत कॉलेजियम अहवालावर काळजीने निर्णय घेण्याचे आवाहन केलं आहे. कॉलेजियमच्या बैठकीतील अहवालावर न्यायाधीश रमण यांनी नाराजी दर्शवली आहे. रमण यांनी म्हटलं आहे की, अहवाल दुर्दैवी आहे कारण सरन्यायाधीशांच्या नियुक्तीचा मुद्दा फार संवेदनशील आहे. नियुक्तीची मोठी प्रक्रिया असते. यामुळे त्यांचे रिपोर्टींग अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. देशाला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बीव्ही नागराथन, तेलंगणना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या नावाची शिफारस केली आहे. यापुर्वीही कॉलेजियमकडून ३ महिला न्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कॉलेजियमसोबत अनेक विषयांवर चर्चा करण्यात येते असं न्यायाधीश रमण यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कॉलेजियमकडून नावाची शिफारस

तेलंगणना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बीव्ही नागराथन
गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए एस ओका
सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे के माहेश्वरी
गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ
केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सीटी रवींद्र कुमार
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एम सुंदरेश
वरिष्ठ अधिवक्ता पी एस नरसिंह

सर्वोच्च न्यायालयात १० पदे रिक्त

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती. त्यानंतर अनेक न्यायाधीश सेवानिवृत्त झाले परंतु नव्याने न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली नाही. मागील आठवड्यात न्यायाधीश आरएफ नरीमन सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात एकूण ९ जागा रिक्त झाल्या आहेत. तर कॉलेजियम सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद असल्यामुळे नावांच्या शिफारशीवर सहमत होत नाही आहे. यामुळे न्यायाधीशांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. न्यायाधीश नवीन सिन्हा सेवानिवृत्त झाल्यामुळे आता रिक्त जागांची संख्या १० झाली आहे. देशातील सगळ्यात मोठ्या न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सर न्यायाधीश यांच्यासह ३४ आहे मात्र नवीन सिंन्हा सेवानिवृत्त झाल्यामुळे न्यायाधीशांची संख्या आता २४ झाली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -