घरदेश-विदेशColombia Plane crash : 16 दिवसांनंतर लष्कराने 11 महिन्यांच्या बाळासह चार मुलांची...

Colombia Plane crash : 16 दिवसांनंतर लष्कराने 11 महिन्यांच्या बाळासह चार मुलांची केली सुटका

Subscribe

नवी दिल्ली : कोलंबियाच्या ऍमेझॉनमध्ये 1 मे रोजी विमान अपघातात (Colombia Plane crash) पायलटसह दोन जणांचा मृत्यू आणि चार मुले बेपत्ता झाली होती. आपण रोजच्या जीवनात काही गोष्टी ऐकतो पाहतो, त्या आपल्याला एखाद्या चमत्कारापेक्षा कमी वाटत नाही. असात प्रसंग समोर आला आहे. या अपघाताच्या दोन आठवड्यानंतर लष्कराने ऍमेझॉनमधून 11 महिन्यांच्या बाळासह चार मुलांना जिवंत बाहेर काढले आहे. याबाबत माहिती देताना देशाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी वक्तव्य केले की, हा क्षण देशासाठी आनंदाचा क्षण आहे.

1 मे ला कोलंबियाच्या ऍमेझॉन रेनफॉरेस्टमधील जंगलाच्या ठिकाणाहून सॅन जोस डेल ग्वाव्हियरकडे उड्डाण करत होते. या विमानात पायलट आणि दोन प्रौढ व्यक्तींसह चार मुले प्रवास करत होती. परंतु या विमानाचा अपघात झाला आणि यात पायलटसह दोन्ही प्रौढांचा मृत्यू झाला. या मृत प्रवाशांमध्ये रानोक मुकुटुय नावाच्या महिलेचा समावेश आहे, जी त्या चार मुलांची आई आहे. परंतु अपघाताच्या ठिकाणी चारही मुलांचा काही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी लष्कराने “ऑपरेशन होप” सुरू केले. मुलांचा शोध घेण्यासाठी स्निफर डॉगसह 100 हून अधिक जवान तैनात करण्यात आले होते. मात्र विमान अपघाताचे कारण काय, हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही. कोलंबियाच्या आपत्ती प्रतिसाद संस्थेने सांगितले की, विमान रडारवरून गायब होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पायलटने इंजिनमध्ये समस्येची नोंद केली होती.

- Advertisement -

मुलांचा शोध घेत असताना सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना झाडाच्या फांद्यापासून बनवलेला निवारा सापडला होता. त्यामुळे त्यांना खात्री पटली की, 11 महिन्यांच्या मुलांव्यतिरिक्त, 13, 9 आणि 4 वर्षे वयोगटातील मुले दुर्घटनेपासून दक्षिणेकडील कॅक्वेटा विभागाच्या जंगलात भटकत आहेत. सशस्त्र दलांनी जारी केलेल्या फोटोंमध्ये जंगलाच्या झाडाच्या फांद्यांमध्‍ये कात्री आणि हेअरबँड दिसले. यापूर्वी देखील एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये एका लहान मुलाची बाटली आणि अर्धवट कापलेल्या फळांचा तुकडा दिसला होता.

ऑपरेशन होपद्वारे मुलांची सुटका
40 मीटरपेक्षा जास्त उंचीची झाडे, जंगली प्राणी आणि मुसळधार पावसामुळे “ऑपरेशन होप” थोडे कठीण होत होते. या बचाव मोहिमेसाठी तीन हेलिकॉप्टर वापर करण्यात आला होता. यातील एका हेलिकॉप्टरमध्ये मुलांच्या आजीचा संदेश रेकॉर्ड करण्यात आला आहे. मुलांना जंगलात पुढे जाऊ नका, कारण ते धोकादायक असू शकते, असा संदेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -