घर देश-विदेश आली रे आली आता चंद्र तुझी...चांद्रयान-3 नंतर भारत चांद्रयान-4 च्या तयारीला; जपान...

आली रे आली आता चंद्र तुझी…चांद्रयान-3 नंतर भारत चांद्रयान-4 च्या तयारीला; जपान करणार सहकार्य

Subscribe

तर भारत आता जपानच्या मदतीने चांद्रयान-4 ही मोहिम राबविणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत चंद्रावर पाऊल ठेऊन आणखी नवनवीन संशोधन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली : आधीच्या अपयशातून धडे घेत भारताने चंद्रासाठी प्रक्षेपीत केलेल्या चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगच्या कामगिरीची इतिहासात नोंदली गेली आहे. चांद्रयान-3 मोहिमेचा लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरला तेव्हा भारताने इतिहास रचला. चांद्रयान-3 च्या यशानंतर आता सर्वांच्या नजरा पुढच्या टप्प्यावर म्हणजेच चांद्रयान-4 वर लागल्या आहेत. (Come, come, come now, Chandra Tuzhi… After Chandrayaan-3, India prepares for Chandrayaan-4; Japan will cooperate)

तर भारत आता जपानच्या मदतीने चांद्रयान-4 ही मोहिम राबविणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत चंद्रावर पाऊल ठेऊन आणखी नवनवीन संशोधन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका अहवालानुसार, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि जपान (Japan) एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) हे एकत्र येऊन लुपेक्स (Lupex) नावाचे चांद्रयान लाँच करणार आहेत. हे लुपेक्स (Lupex) चंद्रावरील सर्वात कठीण प्रश्न शोधण्यासाठी कार्य करणार आहे.

हा असणार चांद्रयान-4 चा उद्देश

- Advertisement -

अलिकडच्या वर्षांत झालेल्या संशोधनात चंद्रावर पाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रावर पाण्याची शक्यता अंतराळ संशोधनाच्या भविष्यावर खोलवर परिणाम करू शकते. या प्रश्नांची ठोस उत्तरे शोधण्यासाठी ल्युपेक्स काम करेल. लुपेक्सचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांवर पाणी आहे की नाही हे शोधणे असणार आहे. आगामी काळातील हे मिशन मूलभूत दोन मार्गाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रथम चंद्रावरील जलस्रोतांचे प्रमाण शोधणे आणि दुसरी म्हणजे गुणवत्ता निश्चित करणे.

हेही वाचा : मंगल मिशनची खिल्ली उडविणाऱ्या New York Times मधील ‘त्या’ कार्टुनची झाली आठवण; युझर्सनी केले ट्रोल

चांद्रयान-3 मोहिम करणार चारसाठी सहकार्य

- Advertisement -

चांद्रयान-3 चा विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरला, त्यानंतर त्यातील प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. आता पुढील 14 दिवस प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील माहिती इस्रोला पाठवणार आहे. चांद्रयान-3 चंद्रावरील माहिती गोळा करून इस्रोला पाठवेल, ज्याचा फायदा आता चांद्रयान-4 मोहिमेसाठी होणार आहे.

हेही वाचा : BRICS मध्ये चांद्रयान -3ची चर्चा; पंतप्रधान मोदी म्हणाले…

2026 मध्ये केले जाणार प्रक्षेपित

भारत आणि जपान या दोन्ही देशांच्या संयुक्त कामगिरीतून सोडण्यात येणारे चांद्रयान-4 हे येणाऱ्या 2025-26 या ही मोहिम राबविली जाणार आहे. हे यान चंद्रावर कमी-गुरुत्वाकर्षणाच्या पृष्ठभागाचा शोध आणि आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डिझाइन केले जाईल. चंद्राशी संबंधित मनोरंजक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भारत-जपान संयुक्तपणे एकत्र येत आहेत. 2026 पर्यंत हे मिशन सुरू केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -