घरCORONA UPDATECoronaVirus: जापानच्या ७० वर्षीय कॉमेडियन अभिनेत्याचं निधन

CoronaVirus: जापानच्या ७० वर्षीय कॉमेडियन अभिनेत्याचं निधन

Subscribe

१७ मार्च रोजी त्यांना कोरोनाची लक्षणं असल्याचे जाणवू लागल्याने त्यांनी २० मार्च रोजी रूग्णालयात दाखल

जगभरातील १९५ देशात थैमान घालत असाणारा कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजारा काही केल्या थांबण्याने नाव घेत नसून या व्हायरसने आतापर्यंत ३३ हजार ५०९ लोकांचा बळी घेतला आहे. तर सात लाखांहून अधिकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. दिवसेंदिवस दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना रूग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे.नुकतेच रविवारी जपानच्या कॉमेडियन केन शिमुरा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

१७ मार्च रोजी त्यांना कोरोनाची लक्षणं असल्याचे जाणवू लागल्याने त्यांनी २० मार्च रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २३ मार्च रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

- Advertisement -

हेही वाचा- Coronavirus: फ्रान्सचे माजी मंत्री पॅट्रिक डेव्हिडजियन यांचा कोरोनाने मृत्यू

रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शिमुरा यांना कोरोणाची लागण झाली होती. पण ७० वर्षीय शिमुरा यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वातून आणि त्याच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने शिमुरा यांच्या निधन झाले. मात्र यांच्या निधनापूर्वी हॉलीवुडचे सुपरस्टार मार्क ब्लम आणि सिंगर सीवाय टकर यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -