घरदेश-विदेशदिलासादायक! गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दिलासादायक! गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

The prices of wheat and wheat flour | गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याकरता सरकारने बुधवारी त्यांच्या साठ्यातील ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली.

Prices of wheat and wheat flour | नवी दिल्ली – महागाईच्या वणव्यात होरपळत असलेल्या भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. गगनाला भिडणाऱ्या गव्हांच्या किमती आता आवाक्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून गहू चार ते सहा रुपये प्रति किलो स्वस्त होण्याची शक्यता आहे.

बिजनेस स्टॅण्डर्डने दिलेल्या वृत्तानुसार, गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याकरता सरकारने बुधवारी त्यांच्या साठ्यातील ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली. या गव्हाची भारतीय अन्न महामंडळमार्फत (Food Council Of India) २ महिन्यांत विविध माध्यमांतून विक्री केली जाणार आहे.

- Advertisement -

पीठ गिरण्यांना ई-लिलावच्या माध्यमातून हे गहू विकलं जाणार आहे. गहू विकून त्याचं पिठ तयार करून ते सामान्य नागरिकांपर्यंत किरकोळ बाजारात २९ रुपये ५० पैशांनी विकले जाणार आहे. थेट सामान्य नागरिकांपर्यंत गव्हाचं पीठ पोहोचवण्याकरता भारतीय अन्न महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील युनिट, सहकारी संघ आणि अन्य संस्थांना २३ रुपये ५० पैसे प्रति किलोच्या दराने विकेल.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर येत्या काळात गव्हाच्या किंमती नियंत्रणात राहणार असल्याचे संकेत आहेत. २०२३-२४ च्या एप्रिल ते मार्च दरम्यान किमान आधारभूत किंमत (Minimum Support Prices) २१.२५ रुपये प्रतिकिलोहून अधिक असेल. केंद्र सरकार २०२३-२३ मध्ये MSPपेक्षा अधिक बोनसची घोषणा करत नाही तोवर नव्या विपणन सत्रात साठा तयार करणे केंद्र सरकारला आव्हानात्मक ठरू शकेल.

- Advertisement -

दरम्यान, नव्या गव्हाचं उत्पादन बाजारात यायला सुरुवात झाली की मध्य प्रदेश वगळता सर्व उत्पादक राज्यात गव्हाच्या किमती एमएसपी दरांपेक्षा खाली उतरतात. बुधवारी गव्हाची किंमत ३३.४३ रुपये प्रति किलो होती. याच दिवशी गेल्यावर्षी गहू २८.२४ रुपये प्रतिकिलोंनी विकले जात होते. यावर्षी गव्हाच्या पिठाची सरासरी किंमत ३७.९५ प्रति किलो आहे. तर, गेल्यावर्षी हाच भाव ३१.४१ रुपये प्रतिकिलो होता. म्हणजेच गहू आणि गव्हाच्या पिठात गेल्यावर्षी पेक्षा यंदा भाववाढ झाली आहे. हे दर आता २९.५० रुपये प्रतिकिलोपर्यंत येऊ शकतात.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -