घरदेश-विदेश'यूट्युब'ची कमान आता भारतीयाच्या हाती; वाचा कोण आहेत यूट्युबचे नवे सीईओ

‘यूट्युब’ची कमान आता भारतीयाच्या हाती; वाचा कोण आहेत यूट्युबचे नवे सीईओ

Subscribe

यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली. सुसान वोजिकी यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्युबचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नील मोहन हे यूट्युबचे पहिले कर्मचारी आहेत, ज्यांना बढतीनंतर सीईओची जबाबदारी देण्यात आली आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या नवीन सीईओची घोषणा करण्यात आली आहे. यूट्युबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली. कंपनीच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक नील मोहन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे नील मोहन हे यूट्युबचे पहिले कर्मचारी आहेत, ज्यांना प्रमोशननंतर कंपनीच्या सीईओची कमान देण्यात आली आहे.

कोण आहेत नील मोहन?
भारतीय वंशाचे नील मोहन हे YouTube चे नवीन CEO आणि उपाध्यक्ष आहेत. 2008 मध्ये नील यांनी यूट्युबमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2013 मध्ये कंपनीने त्यांना 544 कोटी रुपयांचा बोनस दिला होता. यूट्युबची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई हे देखील भारतीय वंशाचे आहेत. 2015 मध्ये त्यांना मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांचे काम पाहता ते सुरुवातीपासूनच वोजिकीचे उत्तराधिकारी मानले जात होते. वोजिकी हे निल मोहन यांच्यातील नेतृत्व गुणवत्तेने आणि कामकाजाने प्रभावित झाले होते.

- Advertisement -

नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ग्लोरिफाईड टेक्निकल सपोर्टने त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी ऍक्सेंचर या कंपनीमध्ये त्यांनी वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी DoubleClick Inc मध्ये 3 वर्षे काम केले. यानंतर त्यांनी सुमारे अडीच वर्षे बिझनेस ऑपरेशन्सची उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. निल मोहन यांना मायक्रोसॉफ्ट या नावाजलेल्या कंपनीमध्ये काम करण्याचा देखील अनुभव आहे. 2008 मध्ये Google ने DoubleClick विकत घेतले, त्यानंतर नील Google मध्ये कार्यरत झाले.

54 वर्षीय सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी यूट्युब मधील आपल्या कामाचा प्रवास थांबविला आहे. 2014 मध्ये त्यांनी यूट्युबच्या सीईओची जबाबदारी स्वीकारली होती. वोजिकी यांनी 25 वर्षांपूर्वी त्यांच्या गॅरेजमधून कंपनी सुरू केली. आज YouTube हे सर्वात मोठे आणि लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बनले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डाॅक्टरांचे कमिशन होणार बंद; सरकार आणणार कट प्रॅक्टिसविरोधी कायदा

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका निवेदनात लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, सुसान वोजिकी यांनी एक खूपच चांगली टीम बनवली आहे. नील मोहन याच्या रुपात त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. ते येणाऱ्या दशकात यूट्युबचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहेत. नील मोहन यांच्यापूर्वी सिलिकॉन व्हॅलीत अनेक भारतीयांनी झेंडा रोवला आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, एडोबचे सीईओ शांतनु नारायण आणि आईबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जगातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये सुद्धा सध्या भारतीय वंशाचे लोक संपूर्ण काम पाहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -