Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'भाजपा प्रत्येक मुस्लिमाला दहशतवादी ठरवण्याचा...', बिलावल भुट्टोंची भारत दौऱ्यावरून परतताच टीका

‘भाजपा प्रत्येक मुस्लिमाला दहशतवादी ठरवण्याचा…’, बिलावल भुट्टोंची भारत दौऱ्यावरून परतताच टीका

Subscribe

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गुरुवारी (4 मे) भारतात पोहोचले होते. हा आटोपून आपल्या देशात परतल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी भारतावर टीका केली आहे. 'सदस्य देशांसमोर काश्मीरबाबत तत्वतः भूमिका मांडण्यात आली होती. काश्मीरबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गुरुवारी (4 मे) भारतात पोहोचले होते. हा आटोपून आपल्या देशात परतल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी भारतावर टीका केली आहे. ‘सदस्य देशांसमोर काश्मीरबाबत तत्वतः भूमिका मांडण्यात आली होती. काश्मीरबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. भारताच्या भूमीवर बसून त्यांनी काश्मीरची वकिली केली. जोपर्यंत भारत आपला एकतर्फी निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हे प्रकरण पुढे जाणार नाही’, असे बिलावल भुट्टो म्हणाले.

भारताच्या टीकेमागे स्वत:ची असुरक्षिततेची भावना असल्याचे बिलावल भुट्टो यांनी म्हटले. शिवाय, ‘भाजपा प्रत्येक मुस्लिमाला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे’, असेही भुट्टो म्हणाले. ‘पाकिस्तानचं हे प्रकरण सदस्य देशांसमोर ठेवलं. भाजप आणि आरएसएसच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे’, असेही ते म्हणाले. (Comment on India by Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto vvp96)

- Advertisement -

‘भारतीय मंत्री भाजपच्या भावनेचं प्रतिनिधित्व करत आहेत. जे मुस्लिमांच्या विरोधात धोरणांना प्रोत्साहन देतात. भारतीय सत्ताधारी पक्ष आणि आरएसएस मला आणि प्रत्येक पाकिस्तानीला ‘दहशतवादी’ घोषित करू इच्छितात. जोपर्यंत भारत काश्मीरबाबत आपली भूमिका बदलत नाही (कलम ३७०-ए स्वीकारत नाही) तोपर्यंत कोणतीही अर्थपूर्ण चर्चा होऊ शकत नाही’, असेही बिलावल भुट्टो म्हणाले.

दरम्यान, बिलावल भुट्टो यांच्या या वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली. ‘जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्येही G-20 च्या बैठका होत आहेत, यात काही असामान्य नाही’, असे एस. जयशंकर म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – ‘काही आंडूपाडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्या’, ‘सामना’च्या अग्रलेखातून राणेंवर हल्लाबोल

- Advertisment -