घरअर्थजगतव्यावसायिक सिलिंडर महिन्याभरात ३०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

व्यावसायिक सिलिंडर महिन्याभरात ३०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Subscribe

व्यवसायिक सिलिंडरात ही कपात करण्यात आली असून इंडियन ऑइलने १ जुलै रोजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, मुंबईत १९ किलोचा व्यवसायिक सिलिंडर आता १९८१ रुपयांचा झाला आहे.

एकीकडे पेट्रोल-डिझलचे (Petrol Diesel Price) दर स्थिर असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) दरात झालेली वाढ सामान्यांच्या अवाक्याबाहेर जात होती. मात्र, एलपीजी सिलिंडरच्या दरात आज तब्बल १९८ रुपायंनी घट झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरात ही कपात करण्यात आली असून इंडियन ऑइलने १ जुलै रोजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, मुंबईत १९ किलोचा व्यवसायिक सिलिंडर आता १९८१ रुपयांचा झाला आहे. (Commercial cylinders cheaper by Rs 300 per month, know new rates)

हेही वाचा – LPG गॅस सिलिंडरवर Subsidy मिळणाऱ्यांना मोठा झटका, ग्राहकांच्या खात्यात Subsidy येणाऱ्यावर शंका?

- Advertisement -

मुंबईत ३० जूनपर्यंत १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २१७१.५० रुपयांना मिळत होता. मात्र, आता १९८ रुपयांनी कपात झाल्याने सिलिंडरचा दर दोन हजारांच्या खाली आला आहे. दिल्लीत हाच दर २२१९ वरून २०२१ रुपये झाला आहे. तर, कोलकात्तामध्ये २३२२ वरून २१४० सिलिंडरची किंमत झाली आहे. व्यावसायिक सिलिंडर दरात कपात झालेली असली तरीही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत अद्यापही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सामान्य नागरिकांचा खिसा चांगलाच रिकामा होत आहे.

हेही वाचा – घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग; सर्वसामान्यांना महागाईचा चटका

- Advertisement -

महिन्याभरात ३०० रुपये कमी

१ जुलै रोजी १९८ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याआधी १ जून रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १३५ रुपये कपात करण्यात आली होती. म्हणजेच, गेल्या महिन्याभरात तब्बल ३०० रुपयांनी सिलिंडर स्वस्त झाला आहे. तर, घरगुती सिलिंडरच्या किंमतीत अखेरचा बदल १९ मे रोजी करण्यात आला होता.

200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी

जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडर २०० रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -