एलपीजी सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात. व्यावसायिक सिलिंडराचा उपयोग हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल्सवर केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडर दरांत सातत्याने कपात करण्यात येत आहे.

police arrested one person for cylinder refilling

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या महागाईपासून नव्या महिन्यात दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीसी सिलिंडर दरांत (Commercial LPG Cylinder) कपात करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (Commercial LPG Cylinder) ११५ रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १६९६ झाली आहे. याची आधी किंमत १८४४ रुपये होती. दरम्यान, ही कपात फक्त व्यावसायिक सिलिंडर दरांत करण्यात आली असून घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा – LIC च्या शेअर धारकांना मिळणार आनंदाची बातमी; नुकसानभरपाईसाठी कंपनीने काढली ‘ही’ योजना

आयओसीएलच्या मते, १ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या इंडेनच्या १९ किलो व्यावसायिक सिलिंडर दरात ११५.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर, कोलकत्ता येथे ११३ रुपये, मुंबईत ११५.५ रुपये आणि चैन्नईत ११६.५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडर दरांत २५ रुपयांनी कपात करण्यात आली होती. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १८५९.५ रुपये होता, त्याची किंमत आता १७४४ रुपये झाली आहे.

१९ किलोच्या सिलिंडरचे नवे दर

  • कोलकत्ता येथे व्यावसायिक सिलिंडर दर १९९५.५० रुपये होता तर, आता त्याची किंमत १८४६ रुपये झाली आहे.
  • मुंबईत व्यावसायिक सिलिंडर दर १८४४ रुपये होता, त्याची किंमत आता १६९६ झाली आहे.
  • चैन्नईत एलीपीसी सिलिंडर दर २००९.५० रुपये होता. तर आता त्याची किंमत १८९३ झाली आहे.

हेही वाचा – आयटीआर भरण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरा आयकर रिटर्न

१४.२ किलो सिलिंडरचे दर

  • कोलकत्ता – १०७९ रुपये
  • दिल्ली – १०५२ रुपये
  • मुंबई – १०५२.५ रुपये
  • चैन्नई – १०६८.५ रुपये

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात. व्यावसायिक सिलिंडराचा उपयोग हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल्सवर केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडर दरांत सातत्याने कपात करण्यात येत आहे.