coronavirus : सर्दी, खोकल्यास जबाबदार विषाणू करणार कोरोनापासून संरक्षण, संशोधनातून खुलासा

संशोधकांना त्यांनी केला खुलासात्मक अभ्यास भविष्यकालीन लसीच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा आहे. कारण लसीकरणामुळे COVID-19 रोगासाठी जबाबदार असलेल्या वर्तमान आणि भविष्यातील व्हायरसपासून संरक्षण प्रदान करू शकतात.

common cold t cells may offer protection against coronaviru says uk study

सामान्य सर्दी-खोकल्याच्या कोरोना विषाणूमुळे ज्या लोकांमध्ये टी पेशींचे प्रमाण जास्त असते त्यांना कोविड-19 रोगाला कारणीभूत ठरलेल्या SARS-CoV2 चा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते, असा खुलासा ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या संशोधकांनी एका संशोधनातून केला आहे.

‘नेचर कम्युनिकेशन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. यात असे म्हटले आहे की, टी पेशींच्या संरक्षणात्मक भूमिकेबाबत प्रथमच पुरावे उपलब्ध झाले आहेत. इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

यापूर्वीच्या आणखी एका अभ्यासात असे म्हटले आहे की, इतर कोरोना विषाणूंद्वारे प्रेरित टी पेशी SARS-CoV-2 नावाच्या विषाणूची ओळख करू शकतात, परंतु एका नवीन अभ्यासात टी पेशींची उपस्थिती SARS-Cov-2 च्या संसर्गावर कसाप्रकारे परिणाम करतात हे सांगण्यात आले आहे.

संशोधकांना त्यांनी केला खुलासात्मक अभ्यास भविष्यकालीन लसीच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा आहे. कारण लसीकरणामुळे COVID-19 रोगासाठी जबाबदार असलेल्या वर्तमान आणि भविष्यातील व्हायरसपासून संरक्षण प्रदान करू शकतात.

इम्पीरियल कॉलेज लंडनमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च (NIHR) चे संचालक प्रोफेसर अजित लालवानी म्हणाले: “आमच्या आत्तापर्यंतच्या संशोधनातील सर्व पुरावे असे सांगतात की, टी पेशी सामान्य सर्दी, खोकल्यास कारणीभूत कोरोना विषाणू (SARS-CoV)- 2 द्वारे प्रेरित असून ते संसर्गाविरूद्ध संरक्षणात्मक भूमिका बजावतात.


coronavirus : …तर कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांची चाचणी करण्याची गरज नाही- ICMR