घरताज्या घडामोडीCorona: कोरोनाबाधिताच्या संपर्कात असूनही का होत नाही कोरोनाची लागण?; नव्या संशोधनातून आले...

Corona: कोरोनाबाधिताच्या संपर्कात असूनही का होत नाही कोरोनाची लागण?; नव्या संशोधनातून आले समोर

Subscribe

जगभरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार गेल्या २४ तासांत १७.३६ लाख नवे कोरोनाबाधित जगात आढळले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होऊनही जगात तितकी चिंता नाही आहे, ज्याप्रकारे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा हाहाकार माजला होता. सध्या अमेरिका, युरोपसह काही देशांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. असे असूनही काही देशांनी निर्बंध शिथिल केले आहेत. पण असे का केले आहे? वैज्ञानिकांनी याचे संभाव्य कारण शोधून काढले आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनच्या (Imperial College London) वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनात यावेळेस काही लोकांना कोरोनाचा धोका खूप कमी का आहे, हे शोधून काढले आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की, सध्या सर्दी-खोकला या सामान्य लक्षणांसोबत लढण्यासाठी लोकांच्या शरीरात संरक्षणात्मक रोगप्रतिकार पेशींचा स्तर खूप वाढला आहे. ज्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी झाला आहे. सोमवारी प्रकाशित केलेल्या या अहवालात दावा केला आहे की, ज्या लोकांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली नाही, त्यांच्या शरीरामध्ये सामान्य सर्दी-खोकला यासोबत लढण्यासाठी टी सेल्स (T Cells)चा स्तर खूप जास्त झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीसोबत राहिल्यानंतरही अशा लोकांना कोरोनाची लागण होत नाही. हे अध्ययन नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहे.

- Advertisement -

इम्पीरियल नॅशनल हार्ट अँड लंग्स इन्स्टिट्यूटच्या रिया कुंदू (Rhia Kundu) म्हणाल्या की, जर कोणताही व्यक्ती कोरोनाच्या संपर्कात येतो, याचा अर्थ असा नाही की, त्याला नेहमीच कोरोना होईल. सध्या आम्ही आमच्या संशोधनात हे शोधले आहे की, शरीरात पहिल्यापासून तयार असलेल्या टी-सेल्सचे चांगले प्रमाण कोरोनापासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे टी-सेल्स सामान्य सर्दीपासून रक्षा करण्याच्या दरम्यान तयार होतात.

दरम्यान ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी ५२ लोकांच्या नमुन्यांवर अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. हे लोकं कोरोनाबाधितांसोबत राहत होते. परंतु यामध्ये अर्ध्या जणांना कोरोना झाला नाही. या अध्ययनात आढळले की, टी-सेल्स प्रतिरक्षा म्हणून भूमिका पार पाडत असतात. अँटीबॉडीच्या तुलनेत टी-सेल्स जास्तवेळेसाठी जीवित राहण्याची शक्यता आहे. टी-सेल्स संक्रमित सेल्सला मारू शकते आणि गंभीर आजार होण्यापासून बचाव करू शकते.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये दिसली धोकादायक लक्षणे


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -