घरताज्या घडामोडीCoronaVirus: चीनच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात मुझफ्फरपूर कोर्टात याचिका दाखल

CoronaVirus: चीनच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात मुझफ्फरपूर कोर्टात याचिका दाखल

Subscribe

या याचिकेवर येत्या ११ एप्रिल मुझफ्फरपूर कोर्टात सुनावणी होणार आहे.

जगभरात करोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. चीनमधील वुहान या शहरातून उदयास आलेला करोना व्हायरस अनेक देशांमध्ये पसरला आहे. भारतात करोना बाधित रुग्णांची संख्या ११० वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात करोना व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बिहार येथील मुझफ्फरपूर कोर्टात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि राजदूत सन बेई डोंग यांच्याविरोध याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर ओझी यांनी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनने करोना व्हायरस तयार करून संपूर्ण जगात दहशत पसरवली असा याचिकाकर्त्याने आरोप केला आहे. भादंवीच्या २६९, २७०, १०९, १२० बी अंतर्गत याचिका दाखल केली आहे. याचिकादार वकील सुधीर ओझा म्हणाले की, जाणीवपूर्व कट रचून चीनने हा व्हायरस तयार केला आहे. यामुळे चीनने संपूर्ण जगात करोनाची दहशत निर्माण केली आहे. याबाबत आज मुझफ्फरपूर कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने ही याचिका स्वीकारली असून याबाबत ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

जगभरात १,५६,४०० लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी ५,८३३ जणांचा मृत्यू झाला. तसंच आता जगभरातील ७३, ९६८ करोना बाधित या आजारातून पू्र्णपणे बरे झाले आहेत, असं जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी या संशोधन संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार चीनमध्ये सर्वाधिक करोना बाधित आहेत.

देशात आतापर्यंत करोना बाधितांची आकडेवारी ११० पोहचली आहे. देशात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील करोना बाधितांची संख्या ३९ वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुड न्यूज! जगभरातील करोनाग्रस्तांपैकी निम्मे रु्ग्ण झाले ‘रिकव्हर’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -