घर देश-विदेश राहुल गांधींनंतर तेजस्वी यादव गुजरात कोर्टात; नेमकं काय आहे कारण?

राहुल गांधींनंतर तेजस्वी यादव गुजरात कोर्टात; नेमकं काय आहे कारण?

Subscribe

 

सुरतः बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात गुजरातमधील स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुजराती लोकं ठग आणि धुर्त असतात, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली होती. त्यामुळे त्याच्यांवर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.

- Advertisement -

अहमदाबाद दंडाधिकारी न्यायालयात दाखल झालेल्या या तक्रारीवर १ मेरोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणात न्यायालय नेमका काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सद्यस्थितीत केवळ गुजरातीच ढग आणि धुर्त असू शकतात. त्यांनी केलेली फसवणूक माफ केली जाऊ शकते. एलआयसी आणि बॅंकांचे पैसे घेऊन तो पळून गेला तर त्याला कोण जबाबदार, असे वक्तव्य तेजस्वी यादव यांनी गेल्या महिन्यात केले होते. तेजस्वी यादव यांचे हे वक्तव्य गुजरातमधील नागरिकांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी बिहारचे प्रतिनिधित्व नुकतेच तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवले आहे. आपला नेता तेजस्वी यादव असेल. तोच आपले नेतृत्त्व करेल. २०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका आपल्याला तेजस्वी यादवच्या नेतृत्त्वात लढायच्या आहेत. तसेच २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा आहे, असे नितीश कुमार यांनी जाहीर केले.

त्यानंतर लालूू प्रसाद यादव यांच्यावर ईडी व सीबीआयकडून कारवाई सुरु झाली. संपूर्ण यादव कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. लालू प्रसाद यादव यांच्या गरदोर सुनेचीही चौकशी करण्यात आली. यामुळे तेजस्वी यादव संतप्त झाले होते. त्यात त्यांनी गुजराती माणसांवर टीका करणारे वक्तव्य केले. परिणामी त्यांच्याविरोधात अहमदाबाद न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे.

तेजस्वी यादव यांच्या आधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मोदी आडनावाचे सर्व चोर कसे, अशी टीका केल्याप्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे.

- Advertisment -