घरदेश-विदेशकंपाऊंडरने 39 विद्यार्थ्यांना एकाच सीरिंजने दिली कोविड 19 लस, मध्य प्रदेशच्या खासगी...

कंपाऊंडरने 39 विद्यार्थ्यांना एकाच सीरिंजने दिली कोविड 19 लस, मध्य प्रदेशच्या खासगी शाळेतील घटना

Subscribe

लोक कोरोना साथी, मंकीपॉक्स यांसारख्या संसर्गजन्य आजारांशी लोक झुंज देत असतानाच एका कंपाउंडरचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्याने एकाच सिरिंजने ३५ हून अधिक बालकांना कोरोनाची लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सागर येथील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला.

पोलिसात गुन्हा दाखल –

- Advertisement -

जितेंद्र अहीरवार नावाच्या कंपाउंडरने एकाच सिरिंजने ३९ मुलांना कोरोना लसीचा डोस दिला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सिरिंजमधून मुलांना ही लस दिली जात असल्याचे काही मुलांच्या पालकांचे लक्ष गेले. काही वेळातच या मोठ्या निष्काळजीपणाचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

लसीकरण मोहिमेदरम्यान घडली घटना  –

- Advertisement -

हे प्रकरण सागर येथील जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे आहे. ही घटना लसीकरण मोहिमेदरम्यान घडली. जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले की, निष्काळजी कंपाउंडरचे नाव जितेंद्र अहिरवार असे असून त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षांवरील ३९ मुलांना कोरोनाची लस दिली जात होती. ही बाब उघडकीस येताच पालकांनी विरोध सुरू केला.

प्रकरणाचा तपास सीएमएचओकडे – 

सागरच्या प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी क्षितिज सिंघल आणि जिल्हा मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) डॉ. डीके गोस्वामी यांच्याकडे सोपवली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोस्वामी यांना सांगितले की, लस देणाऱ्या कंपाउंडरने एकाच सिरिंजमधून ३९ मुलांना कोरोना लसीचा डोस दिला होता. पालकांच्या विरोधानंतर सीएमएचओ शाळेत पोहोचले पण तोपर्यंत अहिरवार निघून गेले होते. आरोपीने आपला मोबाईल बंद केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -