घरताज्या घडामोडीHIV crisis : सेक्ससाठी महिलांच्या कंडोमचा पुरूषांकडून वापर, केनियात कंडोम शॉर्टेज

HIV crisis : सेक्ससाठी महिलांच्या कंडोमचा पुरूषांकडून वापर, केनियात कंडोम शॉर्टेज

Subscribe

केनियामध्ये एचआयव्ही संसर्गाबाबत तरूणांमध्ये जनजागृती होत आहे. पण त्यासोबतच एचआयव्हीसीची नव्याने लागण होणाऱ्यांचा आकडाही नजरअंदाज करण्यासारखा नाही. कुटूंब नियोजनामध्ये कंडोमच्या पुरवठ्यासाठी जागतिक निधी आणि शेजारी राष्ट्रांवर केनिया अवलंबून आहे. पण केनियामध्ये झालेल्या करवाढीचा परिणाम हा दान स्वरूपात येणाऱ्या कंडोमवरही झाला आहे. परिणामी केनियात सध्या कंडोमचा तुटवडा निर्माण झाला आहे. कंडोमच्या वापरामध्ये महिलांच्या कंडोमचा वापर पुरूषांकडून होत असल्याचा ट्रेंड केनियातून समोर आला आहे.

केनियात कंडोम तुटवडा 

केनियाच्या केंद्रीय आरोग्य यंत्रणेने देशात कंडोमचा तुटवडा निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. देशात दानशूर व्यक्तींकडून कंडोमसाठीच्या दानाचा निधी कमी झाल्यानेच हा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. याआधीही केनियाच्या नॅशनल कंडोम स्ट्रॅटेजी २०१८-२३ (KNCS) अहवालामध्ये ही बाब समोर आली होती. केनियात वर्षाला ४५ कोटी ५० लाख इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोमची गरज भासते. याठिकाणी सरकारकडूनच महिन्याला १६ लाख कंडोमचे वाटप होते.

- Advertisement -

पण कंडोम तुटवड्यामुळे देशात आता विरोधकांकडून टिकेचा सूरही उमटू लागला आहे. देशाअंतर्गत कंडोमच्या विक्रीवर लावण्यात आलेला मोठा कर हेदेखील तुटवड्याचे एक प्रमुख कारण आहे. कारण देशात राज्य सरकारकडूनच मोठ्या प्रमाणात कंडोम पुरवण्यात येतात. महत्वाचे म्हणजे हे कंडोम दानाच्या स्वरूपात उपलब्ध होतात. एकट्या सरकारकडूनच महिन्याला १६ लाख कंडोम वाटप होते. पण तुलनेत कंडोमची मागणी ही कोट्यावधीमध्ये आहे. केनियाला वर्षापोटी ४५ कोटी कंडोमची गरज भासते.

कंडोम तुटवड्याची कारणे

एकेकाळी नजीकच्या राष्ट्रांकडून दानाच्या स्वरूपात येणाऱ्या कंडोमसाठी कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात येत नव्हता. पण नजीकच्या काळात कंडोम खरेदीसाठी लागणारी दीर्घकालीन प्रक्रिया हेदेखील एक प्रमुख कारण म्हणून समोर आले आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या पॉप्लुशेन फंडसाठीचे एचआयव्ही आणि डिसेबिलिटीचे एनेलिस्ट लिलियन लॅंगट यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

केनियाच्या केंद्रीय आरोग्य विभागाने नागरिकांना नजीकच्या आरोग्य केंद्रातून विविध सुविधा घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच कुटूंब नियोजनाच्या विविध पद्धतींचा अवलंब करा, असेही आवाहन करण्यात आले आहे. पुरूष कंडोमचा एकीकडे तुटवडा असतानाच दुसरीकडे मात्र महिलांचे कंडोम मात्र अतिरिक्त असल्याचे विभागाने म्हटले आहे. येत्या काळात देशात कंडोमची उपलब्धतता कधी होईल याबाबतची माहिती आम्ही लवकरच देऊ असे केनियाच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ मर्सी वांगांगी यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी केनियामध्ये २ कोटी कंडोमचे वितरण हे मोफत करण्यात आले होते. जागतिक निधी आणि संयुक्त राष्ट्राच्या पॉप्युलेशन फंड (UNFPA)मधून हे कंडोम देण्यात आले होते. केनियाच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थिती व्यतिरिक्त आणि अल्प मध्यम आर्थिक स्तराव्यतिरिक्त कंझ्युमर्स गुड्स, कमर्शिअल ब्रॅण्ड्समध्ये कंडोमचा मार्केट शेअर हा अवघा २ टक्के इतका आहे.

महिलांच्या कंडोमचा पुरूषांकडून वापर

केनियात महिलांना दरवर्षी ६ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोम वितरीत करण्यात येतात. ही मागणी १८ लाख इतकी होईल असे अपेक्षित आहे. या कंडोममुळेच महिलांमध्ये एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण घटले आहे. शिवाय नकोशा गर्भधारणाही टाळणे शक्य झाले आहे. महिलांसाठी देण्यात येणारे कंडोम हे पुरुषांकडूनही वापरण्याचे प्रकार केनियात आढळले आहेत. पण हे कंडोम पुरूषांसोबत सेक्स करताना (MSMs) वापरले जातात. त्याचे कारणही स्पष्ट झाले आहे. महिलांच्या कंडोममध्ये असणारे टिकण्याचे वैशिष्ट्य, उत्तर प्रकारचे लुब्रिकेशन आणि फाटण्याची कमी रिस्क या कारणामुळेच महिलांचे कंडोम पुरूषांकडून वापरले जात आहेत.

पुरूषांचे कंडोम हे सहज उपलब्ध होतात. पण अनेकदा महिलांचे कंडोम हे अनेकदा स्टॉकमध्ये नसतात. मर्यादित आणि अनियमित पुरवठ्यामुळेच महिलांचे कंडोम हे मोठ्या प्रमाणात खर्चिक असल्याचे आढळते. परिणामी कमी प्रमाणात उपलब्ध होतानाच त्यांचे वितरणही मर्यादित प्रमाणात होते. केनियात कंडोम खरेदीसाठी ४६ लाख अमेरिकन डॉलर्सची गरज भासते. त्यामध्ये १३ लाख पुरूषांचे कंडोम आणि ८ लाख ८४ हजार महिलांचे कंडोम हे दानाच्या स्वरूपात उपलब्ध होतात. पुरूषांचा एक कंडोम तयार करण्यासाठी ४.५ डॉलर इतका खर्च येतो. तर महिलांचा कंडोम निर्मितीसाठी ०.३८ इतका खर्च येतो. दानाच्या स्वरूपात मिळणाऱ्या कंडोमनंतरही केनियात पुरेशा प्रमाणात कंडोम उपलब्ध होत नाहीत.

टीन एज प्रेग्नन्सी आणि एचआयव्ही एड्सच्या कारणामुळेच तरूणांमध्ये सेक्सच्या माध्यमातून संसर्गाच्या आजारांबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. syphilis बाबतही जनजागृतीचे प्रमाण यानिमित्ताने वाढले आहे. टीन एनजर्समध्ये असणारी हीच जनजागृती २८ टक्के इतकी आहे. एका सर्वेक्षणानुसार ३९.५ टक्के महिला कंडोमचा वापर करतात. तर पुरूषांमध्ये हा आकडा ७० टक्के इतका आहे. जवळपास १० पैकी ४ महिलाच कंडोमचा वापर करतात. तर पुरूषांमध्ये १० पैकी ७ पुरूष कंडोमचा वापर करतात. जागतिक पातळीवर जर या कंडोम वापराची तुलना केली तर केनियात पुरूषांकडून सरासरी ४० कंडोमचा वापर केला जातो. जागतिक पातळीवर हाच आकडा १४ कंडोम प्रति पुरूष इतका आहे.

HIV बाबतच्या एका सर्वेक्षणानुसार ४.९ टक्के प्रौढ लोकसंख्येत ४.९ टक्के लोक एचआयव्ही बाधीत आहेत. तर १.५ दशलक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात लोक हे एचआयव्हीग्रस्त आहेत. तरूणांमध्ये एचआयव्हीचे लागण होण्याचा आकडा हा २०१८ मध्ये ४४ हजार ८०० इतका होता. तर अडोलसन्ट आणि तरूणांमध्ये साधारणपणे १५ ते २४ वयोगटात ४० टक्के आणि ३३ टक्के अनुक्रमे एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण आहे.


World AIDS Day : तुमच्याही मनात HIV/AIDS बाबत निर्माण होतायत असे प्रश्न?

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -