घरCORONA UPDATEपेंगॉग तलावाजवळ भारतीय सैन्यावर चीन सैनिकांकडून दगडफेक

पेंगॉग तलावाजवळ भारतीय सैन्यावर चीन सैनिकांकडून दगडफेक

Subscribe

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ व ६ मे रोजी रात्री लडाख येथील पेंगॉग तलावाच्या किनारी फिंगर ५ परिसरात भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांनी धक्काबुक्की आणि दगडफेक केली.

पूर्व सीमेवरील सिक्कीममध्ये नाही तर भारतीय आणि चीन सैनिकांमध्ये उत्तर सीमावर हालचाली घडून आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ व ६ मे रोजी रात्री लडाख येथील पेंगॉग तलावाच्या किनारी फिंगर ५ परिसरात भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांनी धक्काबुक्की आणि दगडफेक केली. परंतु दोन्ही सैनिकांमध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

हे क्षेत्र वादग्रस्त आहे. १९६२ साली या परिसरात लढाई झाली होती. दोन वर्षांपूर्वी दोन्ही सैनिक भिडले होते. दोन्ही देशांच्या मध्ये संघर्ष स्थिती सामान्य करण्यासाठी एक प्रकिया तयार करण्यात आली आहे. यातून स्थानिक स्तरावर परिस्थिती हाताळता येते. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, कमांडरांच्या चर्चेनंतर प्रकरण मिटविण्यात आले. मात्र, तणाव स्थिती अजूनही आहे. सीमा प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करण्याचा चीन वारंवार प्रयत्न करतो.

- Advertisement -

भारत-चीन सीमा

– भारत आणि चीन दोन्ही देशांची ३४८८ किलोमीटरची सीमा आहे.

– चीनची सीमा लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला लागून आहे.

- Advertisement -

– सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश इथून ही चीनची सीमा जाते.

– चीनने पीओकेमधील ५१८० वर्ग किलोमीटरवर कब्जा केला आहे.

– १९६३ साली पाकिस्तानने काश्मीरचा अवैध भाग चीनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

– काश्मीरच्या ज्या भागात चीनचा ताबा आहे, त्याला अक्साई चीन असे म्हणतात.

हा ‘२०२०’ चा हिंदुस्थान आहे

भारत आणि चीनचा सीमावाद खूप जुना आहे. सीमावादचा मुद्दा तयार करून चीन दररोज भारताविरुद्ध आक्रमक कारवाई करत असतो. परंतु, भारत ही त्याच प्रमाणे चीनला उत्तर देत असतो. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर पीओके आणि गिलगिट बल्टिस्तानवर भारताने जे पाऊल उचलले आहे. त्यामुळे चीनची तळ पायाची आग मस्तकात गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -