Homeदेश-विदेशCongress about Bareilly Court : बहुधा अशिक्षित असावेत, 'त्या' न्यायाधीशांबद्दल काँग्रेसची टिप्पणी

Congress about Bareilly Court : बहुधा अशिक्षित असावेत, ‘त्या’ न्यायाधीशांबद्दल काँग्रेसची टिप्पणी

Subscribe

राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा प्रचार केला असून, हा आमचा मुद्दाच आहे. प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा हा सामाजिक न्याय आहे. ज्यांच्याकडे क्रयशक्ती नाही त्यांच्यासाठी योजना तयार करा, यामुळे देशाची प्रगती होईल. भारतीय राजकारणात सध्या यापेक्षा मोठा हिताचा मुद्दा नाही,.

(Congress about Bareilly Court) नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेसंदर्भात केलेल्या विधानाला एका हिंदुत्ववादी नेत्याने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्याने न्यायालयात धाव घेतली असून न्यायालायने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यावरून काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट न्यायाधीश बहुधा अशिक्षित असावेत, अशी टिप्पणी काँग्रेसने केली आहे. (Congress criticizes judge who served notice to Rahul Gandhi)

जातनिहाय जनगणनेसंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे देशात गृहयुद्ध सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही आधी त्यांच्याविरुद्ध खासदार-आमदार न्यायालयात खटला दाखल केला. पण तो फेटाळण्यात आला. यानंतर आम्ही जिल्हा न्यायालयात गेलो आणि तिथे आमचे अपील मान्य करण्यात आले. न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून 7 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे, असे याचिकाकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते पंकज पाठक यांनी सांगितले.

हेही वाचा – Court Notice to Rahul Gandhi : जातनिहाय जनगणनेबाबतच्या वक्तव्यावरून राहुल गांधींना नोटीस

याबाबत काँग्रेस नेते उदित राज यांनी न्यायालयावर टीका केली आहे. ही बातमी तर नाहीच शिवाय, त्यावर कोणतीही चर्चा होऊ नये. अशा मानसिकदृष्ट्या आजारी लोकांकडे अशा याचिका दाखल करण्यासाठी वेळही उपलब्ध असतो. अशा याचिका चर्चेतदेखील राहतात. एकूणच न्यायव्यवस्थेची काय दुर्दशा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे निम्न न्यायालय ऐकत नाही. ज्याचा काही अर्थ नाही, अशा प्रकरणातही नोटीस पाठवली जाते, असे सुरू आहे. अशा न्यायमूर्तींना तत्काळ बडतर्फ केले पाहिेजे. हे अशिक्षित लोक आहेत. बहुधा राजकीय दबावापोटी निर्णय घेत आहेत. गोरगरिबांच्या प्रलंबित खटल्यांबाबत निर्णय झाले पाहिजेत, पण ते अशा प्रकारे वेळ वाया घालवत आहेत, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा प्रचार केला असून, हा आमचा मुद्दाच आहे. प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा हा सामाजिक न्याय आहे. ज्यांच्याकडे क्रयशक्ती नाही त्यांच्यासाठी योजना तयार करा, यामुळे देशाची प्रगती होईल. भारतीय राजकारणात सध्या यापेक्षा मोठा हिताचा मुद्दा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (Congress about Bareilly Court: Congress criticizes judge who served notice to Rahul Gandhi)

हेही वाचा – Loksabha : महाविकास आघाडीच्या खासदारांनी लोकसभेत केली ही कामगिरी; वाचा सविस्तर


Edited by Manoj S. Joshi