घरदेश-विदेशइंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; ११ जूनला देशभर आंदोलन करणार

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; ११ जूनला देशभर आंदोलन करणार

Subscribe

देशात दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. इंधन दरवाढीविरोधात आतांबकाँग्रेस आक्रमक झाली आहे. येत्या ११ जूनला काँग्रेस देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर आंदोलन करणार आहे. सोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसने राज्यात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं आहे.

देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत १९ पैशांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत १०१.७१ रुपये तर डिझेलची किंमत ९३.७७ रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही ९५.५६ रुपये तर डिझेलची किंमत ८६.४७ रुपये इतकी आहे.

- Advertisement -

या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. गेले काही दिवस काँग्रेसचे नेते सातत्याने इंधन दरवाढीवरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, काँग्रेस येत्या ११ जूनला देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर आंदोलन करणार आहे.

देशातील महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या महिन्याच्या ४ तारखेपासून आतापर्यंत २२ व्या वेळी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ ५.१५ रुपये इतकी आहे.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -