Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश महागाईच्या मु्द्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत काँग्रेसचे आंदोलन, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

महागाईच्या मु्द्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत काँग्रेसचे आंदोलन, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

Subscribe

देशातील महागाईच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. याबाबत काँग्रेसनेही केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाववाढ, जीएसटी दरात वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन या मुद्द्यांवर राहुल यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

पंतप्रधानांनी संसदेत प्रश्नांची उत्तरे न देणे आणि प्रश्नांपासून पळ काढणे हे असंसदीय आहे, असे राहुल म्हणाले. पंतप्रधानांनी कितीही असंसदीय शब्दांची घोषणा करून विरोधकांना शांत करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यांना या प्रश्नांवर उत्तरे द्यावीच लागतील.

- Advertisement -

राहुल गांधींच्या ट्विटमध्ये काय –

यावेळी डॉलरने पहिल्यांदा 80 रुपयांचा दर पार केल्यानंतरही त्यांनी सरकारला घेरले. त्यांनी ट्विटमध्ये, ‘रुपया पहुंचा 80 पार, गैस वाला मांगे हजार, जून में 1.3 करोड़ बेरोजगार, अनाज पर भी GST का भार।’ जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असेही राहुल पुढे म्हणाले. संसदेत चर्चा आणि प्रश्नांपासून पळ काढणे हे सर्वात ‘असंसदीय’ आहे, पंतप्रधान, असे त्यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

खाद्यपदार्थांवर जीएसटी –

खाद्यपदार्थांच्या जीएसटी दरवाढीवरही राहुल यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, यापुढे दूध, दही, लोणी, तांदूळ, डाळी, ब्रेड यासारख्या पॅकेज केलेल्या उत्पादनांवर जनतेकडून 5% जीएसटी आकारला जाईल. दैनंदिन खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. सिलिंडर 1053 रुपयांचा झाला. म्हणजे ही महागाई सरकारची नसून जनतेची समस्या आहे.

राहुल गांधी यांनी पुढे पंतप्रधान विरोधात असताना त्यांनी महागाई हा सर्वात मोठा मुद्दा बनवला होता, पण आज त्यांनी जनतेला समस्यांच्या खोल दलदलीत ढकलले आहे, ज्यामध्ये लोक दररोज बुडत आहेत. तुमच्या या लाचारीवर पंतप्रधान गप्प आहेत, खुश आहेत आणि खोटे बोलत आहेत. सरकारकडून तुमच्यावर होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराविरोधात मी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे. हा मुद्दा आम्ही सभागृहात जोरदारपणे मांडू. पंतप्रधानांनी कितीही शब्दात ‘असंसदीय’ म्हणत आपल्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला उत्तर द्यावेच लागेल, असे ते म्हणाले

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -