Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश स्वतःचा बचाव करण्यासाठीच राहुल गांधींवर टीका; कॉंग्रेसचा ममता बनर्जींवर निशाणा

स्वतःचा बचाव करण्यासाठीच राहुल गांधींवर टीका; कॉंग्रेसचा ममता बनर्जींवर निशाणा

Subscribe

नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठीच राहुल गांधी यांच्यावर टीका केली, असा आरोप कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी केला आहे.

राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीआरपी आहेत. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पदावर राहतील तोपर्यंत पंतप्रधान मोदी यांचा सामना करणे कठीण आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते. याला कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी उत्तर दिले आहे. खासदार अधीर रंजन म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात डील झाली आहे. राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी ही डील झाली आहे. ममता बॅनर्जी ह्या पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यामुळेच त्या कॉंग्रेस विरोधी भाष्य करत आहेत.

- Advertisement -

ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांपासून ममता बॅनर्जी यांना स्वतःचे संरक्षण करायचे आहे. म्हणूनच त्या पंतप्रधान मोदी यांनी खुश करण्यासाठी कॉंग्रेसवर टीका करण्याचे काम करत आहेत, असा आरोपही खासदार अधीर रंजन यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांना फोनवरून संबोधित केले. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर टीका केली. भाजपशी लढण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला काँग्रेसची मूक सहमती आहे. यातूनच सर्व काही स्पष्ट होते. ज्वलंत मुद्द्यांवरून सर्वांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपा राहुल गांधी यांना ‘हीरो’ बनविण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणीही टार्गेट करू शकणार नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. या आरोपाला कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी उत्तर देताना ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

दरम्यान, परदेश दौऱ्यात राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये भाजप व केंद्र सरकारवर टीका केली. त्याचे पडसाद लोकसभेतही उमटत आहेत. राहुल गांधी यांनी देशाचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांनी याची आधी माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदारांनी केली आहे.

 

- Advertisment -