घरताज्या घडामोडीआमची 'भारत जोडो यात्रा' देशातील भीतीच्या वातावरणाविरोधात; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

आमची ‘भारत जोडो यात्रा’ देशातील भीतीच्या वातावरणाविरोधात; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

भारतात भीती पसरवली जात आहे, दोन धर्मामध्ये भांडण लावले जात आहे. या प्रवासाकडे आम्ही तपश्चर्या म्हणून पाहत आहोत. आम्हाला गरीब जनतेसोबत चालायचे आहे. यात्रेद्वारे आम्ही कुठल्याही राजकीय फायद्याचा विचार करत नाही आहोत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

भारतात भीती पसरवली जात आहे, दोन धर्मामध्ये भांडण लावले जात आहे. या प्रवासाकडे आम्ही तपश्चर्या म्हणून पाहत आहोत. आम्हाला गरीब जनतेसोबत चालायचे आहे. यात्रेद्वारे आम्ही कुठल्याही राजकीय फायद्याचा विचार करत नाही आहोत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या हरियाणातून जात असून, हरियाणातून ही यात्रा पंजाबमध्ये दाखल होणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (Congress Bharat Jodo Yatra An atmosphere of fear in the country Rahul Gandhi bjp)

या पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले की, “दक्षिणेतील राज्यांमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळाला होता. भाजपावाले म्हणायचे की, हिंदी पट्ट्यातील लोकांचा पाठिंबा मिळणार नाही आणि यात्रा फ्लॉप ठरेल, पण तसे झाले नाही. भारतात भीती पसरवली जात आहे, दोन धर्मामध्ये भांडण लावले जात आहे. या प्रवासाकडे आम्ही तपश्चर्या म्हणून पाहत आहोत”

- Advertisement -

“आम्हाला गरीब जनतेसोबत चालायचे आहे. यात्रेद्वारे आम्ही कुठल्याही राजकीय फायद्याचा विचार करत नाही आहोत. सध्या भारतात आर्थिक भेदभाव होत आहे. मीडिया आणि अनेक संस्था दोन-चार लोकांच्या हातात आहेत. याविरोधात ही यात्रा आहे. आमचे लक्ष्य फक्त यात्रा आहे. जनतेचे मन वळवण्याचा प्रयत्न करणे आहे. सध्या देशातील जनतेमध्ये फूट पाडून त्यांच्यात द्वेष पसरवला जात आहे”, अशी टीका राहुल गांधींनी केली असून, काँग्रेसने कधी म्हटले आहे का की एका धर्माने दुसर्‍या धर्माशी लढावे? असा सवालही उपस्थित केला.

  • ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली.
  • या महिन्यात यात्रेचा समारोप होईल.
  • 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून यात्रेचा समारोप होईल.
  • ही पदयात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून गेली आहे.

हेही वाचा – 1993’च्या बॉम्बस्फोट मालिकेची पुन्हा धमकी; आरोपीला पोलिसांकडून अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -